आदरणीय मंत्री श्री गिरीष भाऊ महजन यांच्या प्रमुख उपस्थितीत बेटावद खुर्द येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर संपन्न_
J.B.N न्युज जामनेर
श्री प्रकाशचंदजी जैन वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बेटावद खुर्द येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
सदर शिबिरामध्ये गावातील 132 रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात आले. सदर कार्यक्रमाला माननीय मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी वेळात वेळ काढून आयोजकांच्या विनंती ला मान देउन उपस्थिती लावली.
माननीय गिरीश भाऊ यांनी गावातील लोकांना तसेच डॉक्टरांना मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे खूप कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मदत केल्यामुळे सर्व गावकऱ्यांचे ट्रस्टच्या वतीने मनःपूर्वक आभार.🙏🏻🙏🏻🙏🏻