आ.एकनाथ खडसेंवर आ. चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत कडाडले
कैलास कोळी मुक्ताईनगर
आमदार चंद्रकांत पाटील यांनी निवासस्थानी आज पत्रकार परिषदेत महायुती सरकारच्या विकास कामांचा आणि जनकल्याण योजनांचा सविस्तर आढावा मांडला. सरकारने सादर केलेल्या रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून त्यांनी विविध योजनांचा उल्लेख केला आणि आमदार एकनाथ खडसे यांचे वृत्तीला आपला विरोध असून महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार आहे तसेच मुंडोळदे ते सुलवाडी पूल करून दाखवा असे आव्हान देणारे माझा सत्कार कधी करतील त्याची मी वाट पाहत असून आमदार पाटील यांनी आमदार खडसेंचा चांगलाच समाचार घेतला.
महायुती सरकार हे एकमेव असे सरकार आहे जे विकास आणि कल्याण या दोन्ही घटकांना प्राधान्य देते. सर्वांगीण विकासासाठी या दोन्हींचा समतोल साधणे आवश्यक आहे, जे महायुती सरकारने नेहमीच केले आहे, ” असे त्यांनी सांगितले. शासनाने राबवलेल्या विविध विकास योजनांची माहिती देत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तसेच बेरोजगारांसाठी रोजगार लाडका भाऊ मुख्यमंत्री सहायता निधी, शेतकऱ्यांना वीज माफ अशा अनेक कल्याणकारी योजना महायुती सरकारच्या काळात राबविण्यात आलेल्या असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
पत्रकार परिषदेमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेंचे दुसरे नाव भूलथापा असले पाहिजे असा टोला मारीत खडसे म्हणजे एक जोक झालेले आहे. सकाळी कोणत्या पक्षात तर संध्याकाळी कोणत्या पक्षात हे त्यांचे समजतच नाही पक्षासाठी ते काम करीत नसून स्वतःच्या मुलीसाठी ते फिरत आहे पक्षाचे ध्येयधोरणे च्या विरोधात सर्व चालू असून पक्षाचे खरे काम माजी मंत्री सतीश पाटील गुलाबराव देवकर हे करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तीस वर्ष विविध पदे भूषविणारे यांना बोदवड करांची तहान भागवली नाही ती मी पूर्ण केली तसेच मुक्ताईनगर साठी 32 कोटीची नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन नुकतेच केलेले असल्याचे सांगत खडसेंनी साखर कारखान्यामध्ये पार्टनरशिप केली होती 150 कोटीचे कर्ज घेऊन ते सेटल केले असा आरोप करीत मधुकर सहकारी साखर कारखाना बंद पाडण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.
मुख्यमंत्री माझे नेते ते सांगतील तो निर्णय मान्य. महायुती असल्याने मुक्ताईनगर विधानसभा त्या जागेवर भाजपने दावा केला आहे असे आमदार पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सांगितले की भाजपने दावा केला हे निश्चित आहे दावा करणे काही गैर नाही मी पण लोकसभेच्या वेळेस दावा केला होता असे सांगितले.
मी अपक्ष आमदार जरी आहे पण शिवसेनेचे काम करीत आहे शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून कामे केली. बाळासाहेबांचे विचार घेऊन काम केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझे नेते आहेत ते जे सांगतील ते मला मान्य असेल सीएम म्हणजे कॉमन मॅन असे असून मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी आता सहज मुख्यमंत्र्यांना भेटता येते जे दोन दिवसाच्यावर मंत्रालयात गेले नाही त्यांना हे काय समजेल असा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आमदार पाटील यांनी टोला लगावला.