प्रतिनिधी.गजानन क्षीरसागर
पाचोरा.
लोहारी तालुका पाचोरा येथे
मेंढपाळ धनगर समाजातील गोरख शिवराम शिंगाडे वय वर्ष 11 यांचे आज दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 9:30 वाजता लोहारी बुद्रुक येथे गट क्रमांक 15 मध्ये अंगावर वीज कोसळून अकस्मात निधन झाले तसेच आई मंगलाबाई शिवराम शिंगाडे या जखमी झाल्या असून दोन बकऱ्या या मृत्युमुखी पडले आहेत. या घटनेमुळे मेंढपाळ धनगर कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून त्या ठिकाणी लोहारी सरपंच प्रवीण पाटील यांनी पिंपळगाव पोलीस स्टेशनला कॉल करून तात्काळ पंचनामा करून घेतला. पाचोरा येथे शवविचेदन करण्यात आले. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी पिंपराळा (नांदगाव) येथे वाहन रवाना झाले. या कुटुंबाला तात्काळ शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी सर्कल अधिकारी एम एस पाटील , लोहारी सरपंच प्रवीण पाटील, पिंपळगाव पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेश नरवडे,माणुसकी ग्रुपचे गजानन क्षीरसागर, आधार खाटीक ,यांनी मदत कार्य केले.
