प्रतिनिधी.गजानन क्षीरसागर
लोहारा ता पाचोरा परिसरातील परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते त्यामध्ये कापूस सोयाबीन मका ज्वारी इत्यादी पिकांचा तोंडी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला होता त्याबाबत शासन स्तरापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या तक्रारी शासन दरबारी गेल्यामुळे आज प्राथमिक नुकसान अहवाल दिनांक 23/10/2024 रोजी तलाठी मोहन कुलकर्णी लोहारा ,कृषी सहाय्यक आर एच जोहरे, कृषी सहाय्यक रोहिणी पाटील, यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन मका /कापूस, पिकाचे पंचनामे केले यावेळी शेतकरी देवबा चौधरी, राजू सुर्वे नंदू सुर्वे भास्कर भोई अनिल तडवी विशाल पवार दीपक राजपूत इत्यादी व शेतकरी वर्ग हजर होते पंचनामे सर्वांचे सरसकट केले जातील असे तलाठी व कृषी सहाय्यक यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
