भुसावळ :- येथे दि.२८/१०/२४ सोमवारी भारतीय बौद्ध महासभा, जळगांव पुर्व अंतर्गत प्रथमच “महीला कार्यकर्ता प्रक्षिक्षण “शिबीराचे शिलरत्न बुद्ध विहार, झे टी सी रोड , सात नंबर पोलिस चौकी मागे,भुसावळ या ठिकाणी सकाळी १०ते ४ वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीराचे अध्यक्ष महिला जिल्हा अध्यक्ष प्रियंका अहिरे हया राहतील तर शिबीराचे प्रमुख मार्गदर्शिका महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संस्कार विभागाचे स्वाती गायकवाड हे राहतील आणि प्रमुख उपस्थतीमध्ये राज्य संघटक लताताई तायडे, के. वाय. सुरवाडे, जिल्हा सरचिटणीस वैशालीताई सरदार, जिल्हा कोषाध्यक्ष कल्पना तायडे, जिल्हा अध्यक्ष रविंद्र वानखेडे, जिल्हा सरचिटणीस सुशिलकुमार हिवाळे, शैलेन्द्र जाधव हे उपास्थित रहाणार; आहेत.
तरी जिह्यातील सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या महीला पदाधिकारी व कार्यकर्त्या यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे असे आव्हान जिल्हा संघटक, वनमालाताई हिवाळे यांनी केले आहे.
