जळगाव सुर्वण नगरीला आता कश्मिरी सुगंधाची मोहिनी”आता जामनेर होणार केशरचे सुगंधीत नंदनवन”

जळगाव सुर्वण नगरीला आता कश्मिरी सुगंधाची मोहिनी”
आता जामनेर होणार केशरचे सुगंधीत नंदनवन”


समुद्र सपाटी पासून 1585 मी उंची वर काश्मिरी पर्वतांच्या कुशित पिकवल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट औषधी गुणधर्म असलेल्या मसाल्यांपैकी एक काश्मिरी कोंग म्हणजेच केशर उत्पन्नाचा प्रयोग जामनेरातील उच्चशिक्षीत तरुणांनी यशस्वी केला.
श्री सुवेक विवेक कुलकर्णी आणि श्री. संकेत शंकर पाटील या दोन तरुणांनी श्री राजेश तुकाराम चौधरी व श्री. नरेश दत्तु घुले या दोन मित्रांच्या तांत्रीक मदतीने अपार कष्टातून जळगावातील जामनेरात प्रथमच केशरचे स्वर्ग प्रस्थापिन केले.
श्री सुवेक व श्री संकेत हे दोन्ही इंजिनिअर असून मल्टीनेशनल कंपनीन उच्च पदावर कार्यरत आहेत, नोकरी सोबत स्वतः चा एखादा व्यवसाय हवा हा त्यांच्या अंतरमनाचा शब्दनाद एकून त्यांनी केशर शेती करण्याचा निर्णय घेतला
सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीने त्यांनी माहीती मिळवण्यास सुरुवात केली. त्या नंतर श्रीनगर मधील संशोधन स्थळांना भेटी दिल्या आणि खूप अभ्यासपूर्ण परिश्रमातून त्यांनी केशर
शेतीचा हा प्रयोग जामनेरात प्रत्यक्ष राबवला.
मागील दोन वर्षापूर्वी त्यांनी नोयडा येथे
काही मित्रांची मदत घेऊन पहिला प्रयोग केला पण ते सांगतात की त्यात त्यांना अपेक्षीत यश मिळाले नाही त्या नंतर त्यांनी जामनेर व नोयडा येथे या वर्षी 5 ऑगस्ट 2024 रोजी केशर बिजची लागवड केली व दोन्ही ठिकाणी त्यांना घवघवीत यश मिळाने त्यांना दोन्ही प्लांट मिळून तब्बल 12 किलो केशर उत्पन्नाची अपेक्षा आहे.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला या दोघांनी पुलवामा मधील लेथपुर येथून केशर बीज ची आयात केली. त्यावर बुरशीनाशका सारख्या विविध प्रक्रिया करून त्यांना अंधाऱ्या खोलीत ठेवल गेल. इनडोरफार्मिंग मधील ऐरोफोनिक्स तंत्रज्ञानाच्या मदतीने 500 स्क्वेअर फूट मध्ये केशरची लागवड केली गेली.
या दोन्ही तरूणांनी मिळून मनस्वी केलेला हा प्रयोग इतर तरूणाई साठी दिपस्तंभासारख कार्य करेल.
पारंपारीक शेतीला छेद देत चार भिंतीमध्ये ही शेती केली जाऊ शकते हा नविन पायंडा या तरुणांनी जामनेर करांसाठी आखून दिला. पारंपारीक शेतीला समांतर पर्याय म्हणून केशर शेती केली जाऊ शकते याचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे. बेरोजगार तरुणांना करियरच्या नविन संधी
एरोफोनिक्स तंत्रज्ञानात मिळू शकतात अशी शक्यता या तरूणांनी वर्तवलेली आहे.
आपण समाजाचं काही तरी देणं लागतो या उक्तीला जागून इच्छुक तरुणांना मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजीत करण्याचा या दोघांचा मानस आहे.

error: Don't Try To Copy !!