पहूर, ता.जामनेर (वार्ताहर) पहूर येथून जवळच असलेल्या सोनाळा फाट्याजवळ मध्यरात्री महिंद्रा पिकप गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात 14 जण जखमी झाल्याची घटना घडली.
पहूर येथून जवळच असलेल्या जामनेर रोडवरील सोनाळा फाट्याजवळ काल मध्यरात्री महिंद्रा पिकप गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात पावरा समाजाचे एकूण 14 जण जखमी झाले. यातील धर्मा बारेला वय 30, जितेंद्र बारेला वय 16, सुभा राजू बारेला वय 13, तुळशीराम बारेला वय 35, अनिल तोवर सिंग बारेला वय 30 हे गंभीर जखमी झाले .असून यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ घालवण्यात आले आहे .तर नऊ जणांना पहूर ग्रामीण रुग्णालयात आणून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
पहूर अपघातांची मालिका
पहूर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून अपघाताची मालिका सुरू असून यात परवा मध्यरात्री पहूर येथे जामनेर रोडवर मक्का वाहतुकीच्या रोडवर वाळत टाकलेल्या असल्यामुळे मोटर सायकल व 407 च्या झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडते न घडते तोच दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आयशर व यामाहा मोटरसायकल मध्ये झालेल्या अपघातात दोन जण गंभीर गंभीर जाती झाले होते. तर पाळधी जवळ झालेल्या अपघातात वाहन चालकाचा मृत्यू झाला होता. तसेच शेंदुर्णी येथेही ट्रॅक्टरवरून पडून एक जण मयत झाल्याची घटना घडली होती. या सततच्या अपघातामुळे पहूर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे .दरम्यान काल मध्यरात्री झालेल्या महिंद्रा पिकप पलटी होऊन झालेल्या अपघातात 14 जण जखमी झाले असले तरी अद्याप पर्यंत पहूर पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल झालेला नसल्याचे समजते.
सोनाळा फाटा जवळ झालेल्या महिंद्रा पिकप गाडी पलटी झाली त्या अपघातात 14 जण जखमी
