जामनेर: महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जामनेर नगर पंचायत समिती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जामनेर तालुका शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा वार्षिक सभा २०२४-२५ व पारितोषिक वितरण समारंभ आज सकाळी ११:३०वा. पंचायत समिती सभागृहात उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय पोषण आहार अधीक्षक तथा विस्तार अधिकारी व्ही व्ही काळे, प्रमुख अतिथी तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, क्रीडा अधिकारी सचिन निकम, ज्ञानगंगा विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.जे.सोनवणे, जनता हायस्कूल नेरी मुख्याध्यापक आर.ए.पाटील, श्रीमती प्रभावती गजानन गरुड माध्यमिक विद्यालय बेटावद मुख्याध्यापक एस.आर.निकम, जीनियस स्कूल संचालिका शिल्पा पाटील आदी. मान्य. यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जामनेर तालुका क्रीडा संयोजक प्रा.डॉ.आसिफ खान यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.समीर घोडेस्वार यांनी केले.
“जीवन गौरव पुरस्काराने” सन्मानार्थि ज्येष्ठ क्रीडा शिक्षक असे: अनंतराव जाधव (ज्येष्ठ क्रीडा शिक्षक), राजेंद्र सिताराम चौधरी (मुख्याध्यापक आचार्य गजाननराव गरुड विद्यालय शेंदुर्णी ), विकास रघुनाथ पाटील (मुख्याध्यापक नि.प. पाटील विद्यालय पळासखेडा मिराचे), शेख जलाल शेख लाल (प्रभारी मुख्याध्यापक अंजुमन उर्दू हायस्कूल), दिनेश अभिमान पाटील (मुख्याध्यापक अ.चि.पाटील विद्यालय, रोटवद),
भगवान लक्ष्मण तुरे (नूतन माध्यमिक विद्यालय कापुसवाडी), गिरीश चंद्रराव पाटील ( इंदिराबाई ललवाणी विद्यालय, जामनेरपुरा) वरील सर्व ज्येष्ठ क्रीडा शिक्षकांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले
तसेच तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धाचे उत्कृष्ट आयोजन, नियोजन केल्याबद्दल शालेय स्पर्धेसाठी उत्कृष्ट शाळा पुढील प्रमाणे:-
१.लॉर्ड गणेशा इंग्लिश मीडियम स्कूल,
२.ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,
३.पोदार जीनियस इंटरनॅशनल स्कूल,
४.जिकरा इंग्लिश मीडियम स्कूल,
५.बोहरा सेंट्रल स्कूल.,
६ महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय देऊळगाव-गुजरी
७. आचार्य गजाननराव गरुड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेंदुर्णी
८. जैन इंटरनॅशनल स्कूल
शाळेचा सत्कार सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला
त्यानंतर तालुकास्तरीय शालेय स्पर्धेत उत्कृष्ट पंच म्हणून कार्य केल्याबद्दल २१ क्रीडा शिक्षकांचा शासकीय प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वार्षिक पारितोषिक समारंभ सर्व सन्मानचिन्ह सौजन्य- जामनेर तालुका क्रीडा संयोजक डॉ. आसिफ खान यांच्या तर्फे देण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज रानोटकर, व्ही एन पाटील, प्रा.समीर घोडेस्वार, दीपक चौधरी, प्रवीण पाटील, नरेंद्र पाटील, आनंद मोरे, देवा पाटील, अनिल पाटील, जहीर खान, युवराज सूर्यवंशी, सुनील मोझे, गजानन कचरे आदी. क्रीडा शिक्षकांनी परिश्रम घेतले.
जामनेर तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा वार्षिक सभा व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न:🔹तालुक्यातून ८ उत्कृष्ट शाळा, ज्येष्ठ क्रीडा शिक्षकांना “जीवन गौरव पुरस्काराने” सन्मानित..!
