श्री प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

जामनेर पासून सुमारे २ मैल अंतरावर स्थित श्री प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेज अँड रिसर्च, पळासखेडे येथे दिनांक ८ ते ९ जानेवारी २०२५ दरम्यान दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. पहिल्या दिवशी या कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे सचिव श्री. मनोजकुमारजी कावडिया यांच्या अध्यक्षते मध्ये करण्यात आले. उद्घाटन समारंभाच्या वेळी संस्थेचे सचिव तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मयुर भुरट, डी. फार्मसीचे विभाग प्रमुख डॉ. सुनील बावस्कर, उपप्राचार्य प्रा. प्रफुल्ल पाटील हे उपस्थित होते. यावेळी प्राचार्य आणि सचिव यांनी आपल्या भाषणातून व्यक्तिमत्व विकास आणि इंग्रजी भाषेचे महत्त्व यावर विद्यार्थ्यांना संबोधित केले. या कार्यशाळेसाठी प्रा. किशोर सोनवणे (सारस्वत इंग्लिश अकॅडमी, सुरत) आणि प्रा. चिंतन सोनवणे (तोलानी मेरीटाइम इन्स्टिट्यूट, पुणे) यांना अतिथी व्याख्याते म्हणून बोलवण्यात आलेले होते. पहिल्या दिवशी सकाळ सत्रामध्ये प्रा. चिंतन सोनवणे यांनी मुलाखतीचे तंत्र आणि रिझ्युमे लिहिणे या मुद्द्यांवर चतुर्थी वर्ष बी. फार्मसी आणि द्वितीय वर्ष डी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर दुपारच्या सत्रामध्ये प्रा. किशोर सोनवणे यांनी व्यक्तिमत्व विकास आणि संवाद कौशल्य या विषयावर प्रथम वर्ष बी. फार्मसी आणि प्रथम वर्ष डी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी
प्रा. किशोर सोनवणे यांनी
‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अंतर्गत सर्व शिक्षकांना अध्यापन कौशल्य तसेच महाविद्यालयाच्या विकासासाठी आणि यशस्वीतेसाठी आवश्यक असणाऱ्या मुद्द्यांवर प्रशिक्षण दिले. तसेच दुपारच्या सत्रामध्ये प्रा. चिंतन सोनवणे यांनी
‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अंतर्गत सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महाविद्यालयात काम करत असताना प्रामाणिकपणा, एकमेकांमधील समन्वय, सहकार्य आणि एकसंघ कार्यप्रणाली या विषयांवर प्रशिक्षण दिले.
या दोन दिवसीय कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मयुर भुरट यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अशोक अग्रवाल, डॉ. भुषण गायकवाड आणि डॉ. संजय नागदेव यांनी मेहनत घेतली.

error: Don't Try To Copy !!