लोहारा विकासो संस्थेत प्रजासत्ताक दिन साजरा.

प्रतिनिधी.गजानन क्षीरसागर
लोहारा ता पाचोरा येथील लोहारा विकास संस्थेचे श्री पालीवाल यांचा निरोप समारंभ
लोहारा विविध कार्यकारी सहकारी संस्थेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.ध्वजारोहण व भारत मातेचे पूजन संस्थेचे व्हाईस चेअरमन ग.भा भागाबाई सरोदे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर संस्थेचे श्री दत्तात्रेय नथू पालीवाल हे रासायनिक खत विभाग व धान्य विभागामध्ये गोडाऊन कीपर म्हणून कार्यरत होते त्यांचा आज रोजी संस्थे मार्फत निरोप समारंभ साजरा करण्यात आला
त्यांचा सत्कार चेअरमन प्रभाकर चौधरी यांनी शाल ,श्रीफळ व कपडे देऊन त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला.संस्थेने छोटेसे मानधन म्हणून रुपये 24 हजार रुपयाचा धनादेश संस्थेचे संचालक विकास देशमुख यांच्या हस्ते दिला यावेळी संस्थेचे चेअरमन प्रभाकर चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांनी पन्नास वर्षाचा कार्यकाळ हा संस्थेच्या हितासाठी घालवला व विश्वासाने व एकनिष्ठ ने कामकाज पाहिले या संस्थेच्या भरभराटीत त्यांचे फार मोठे योगदान आहे त्यांना पुढील आयुष्य सुखाचे व आनंदाचे जावो अशा शुभेच्छा दिल्या तसेच आपले लोहारा येथील सैनिक संदीप सुधाकर बाविस्कर यांनी लोहारा गावातील सैनिक सुट्टीवर येऊन पुन्हा ड्युटीवर जाण्यासाठी रेल्वे स्टेशन पर्यंत 50 किलोमीटरचा प्रवास रात्री अपरात्री करताना वाहनाची गरज भासत होते हे लक्षात घेऊन त्यांनी सर्वांना मोफत प्रवास करता येईल अशी इको व्हॅन उपलब्ध करून दिली त्या बद्दल लोहारा संस्थेने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे चेअरमन संचालक सर्व स्टॉप गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ व शेतकरी सभासद उपस्थित होते.

error: Don't Try To Copy !!