जि.प.शाळा सोनाळे येथे शिक्षण परिषद पार पडली….दिनांक एक ऑक्टोबर 2024 रोजी जामनेर तालुक्यातील पाळधी केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनाळे तालुका जामनेर जि. जळगाव येथे संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनाळे गावचे सरपंच श्री रघुनाथ दादा पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जामनेर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री राम लोहार साहेब,शालेय पोषण आहार अधीक्षक विष्णू काळे साहेब हे होते. गटशिक्षणाधिकारी श्री लोहार साहेब यांनी नवोपक्रम,विद्यार्थी गुणवत्ता विकास व विविध उपक्रमांबाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले. शापोआ अधीक्षक श्री काळेसाहेब यांनी मुख्यमंत्री सुंदर शाळा अभियानाबाबत उपस्थितांना माहिती दिली. या कार्यक्रमाला पाळधी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री बाबुराव धुंदाळे साहेब,केंद्रप्रमुख श्री संजय भानुदास पाटील,केंद्रप्रमुख सौ. शुभांगी पाटील, केंद्रप्रमुख सौ.संगीता पालवे, केंद्रप्रमुख श्री सुरेश अंभोरे,केंद्रप्रमुख श्री प्रदीप जाधव, केंद्रप्रमुख श्री पितांबर राठोड, केंद्रप्रमुख श्री विजय गायकवाड, केंद्रप्रमुख श्री विकास वराडे,केंद्रप्रमुख श्री चंद्रकांत विसपुते,क.द. नाईक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस.एन. पाटील सर, विषय तज्ञ श्री महेंद्र नाईक, सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त तोंडापूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री संदीप पाटील सर जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री संदीप सोनार सर,सोनाळे गावचे सरपंच श्री रघुनाथ दादा पाटील,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेविका ज्योतीताई तायडे,पाणी फाउंडेशन चे सदस्य, सोनाळे येथील ग्रामस्थ मंडळी व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोपाल पाटील,व्यवस्थापन समिती सदस्य यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये सोनाळे येथील जि.प.शाळेने जामनेर तालुक्यातून द्वितीय क्रमांक मिळवला. सोनाळे गावातील ग्रामस्थांच्या वतीने शाळेमध्ये या दिवशी ऋणनिर्देश सोहळा आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमात ऐश्वर्या पाटील व शौर्य गुरव या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पाळधी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक,व शिक्षक- शिक्षिका,नवनियुक्त युवाशक्ती प्रशिक्षणार्थी शिक्षक व शिक्षिका हे कार्यक्रमाला उपस्थित होते.या शिक्षण परिषदेमध्ये शिक्षकांना मार्गदर्शन करताना पाळधी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री बाबुराव धुदांळे साहेब यांनी मागील सभेचा आढावा घेतला.तसेच नवोपक्रम अहवाल,अध्ययन निष्पत्ती बाबत,महावाचन बाबत,समग्र प्रगती पुस्तक बाबत माहिती,आदर्श नमुना पाठ,विनोबा भावे अँप,विद्यार्थी गुणवत्ता विकासाबाबत शिक्षकांना माहिती देण्यात आली.शिक्षण परिषदेमध्ये कार्यक्रमाची प्रस्तावना सोनाळे शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर सोनवणे,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रत्नकांत सुतार सर यांनी केले.अध्ययन निष्पत्ती प्रश्ननिर्मिती श्री सागर महाजन, नवोपक्रम अहवाल ज्योतीताई पाटील,आदर्श पाठ श्री रवींद्र क्षीरसागर,व आभार प्रदर्शन विवेक वखरे यांनी केलेसदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, पाणी फाउंडेशन सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच,उपसरपंच, व ग्रामस्थ मंडळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले
जि.प.शाळा सोनाळे येथे शिक्षण परिषद पार पडली
