
वाकडी.ता.जामनेर.दि.३०/०९/०२५ वाकडी येथे प्रामुख्याने भरपूर शेतकऱ्यांचे कपाशी पिकांचे नुकसान झाले ,अतिवृष्टी अकस्मात संकटामुळे शेतकरी हा हवालदिल झाला आहे,या आठवड्यातील अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे कपाशी, सोयाबीन,तूर,मका,केळी इतर कडधान्ये,या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, बराच ठिकाणी शेतजमीनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, यावेळी फत्तेपूर मंडळ कृषी अधिकारी श्री.एस.एस.लोहार, सहाय्यक कृषी अधिकारी श्री.राजेश नाईक, वाकडी पोलीस पाटील घनश्याम पाटील यांनी आज वाकडी येथील शेतकरी बाजीराव जोशी यांच्या शेतात जावून पिकांची पाहणी तसेच वाकडी परिसरात प्रत्यक्ष शेतात जावून सर्व भागाची पाहणी केली,वाकडी येथील तलाठी परशुराम पवार, कोतवाल वैभव न्हावी यांनी शेतात जावून पिकांची पाहणी करून पंचनामे केली आहे,कुठला नुकसान ग्रस्त शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, वाकडी येथील शेतकऱ्यांच्या लवकर अहवाल तयार करावा अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहेत.