लुबाडलेले 1600 रुपये काही मिनिटांतच सैनिकाच्या खात्यात परत

पाचोरा – निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारिता हे लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून ओळखले जाते, याचे जिवंत उदाहरण नुकतेच पाचोरा येथे पाहायला मिळाले पत्रकार संदीप महाजन यांनी अनधिकृत रेल्वे तिकीट एजंटकडून भारतीय सैनिकाची करण्यात आलेली आर्थिक लुबाडणूक उघडकीस आणताच संबंधित भामट्याने युद्धजन्य परिस्थिती काळात अफरातफरीत केलेली फसवणूक लपवण्यासाठी केवळ काही मिनिटांतच सैनिकाच्या खात्यात 1600 रुपये परत वर्ग केले.ही घटना आहे पिंपरी सार्वे येथील रहिवासी आणि सध्या CISF मध्ये कार्यरत असलेल्या जवान प्रदीप बाविस्कर यांच्या बाबतीत. देशात युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळे जवानांना तातडीने त्यांच्या सेवास्थळी परत हजर राहण्याचे आदेश मिळाले होते. या घाईत त्यांनी रेल्वे तिकीट काढण्यासाठी पाचोरा येथील तिकीट एजंटची मदत घेतली. मात्र त्या एजंटने एका सामान्य तिकिटासाठी वाजवी रक्कमेपेक्षा तब्बल 1600 रुपये जास्त रक्कम आकारून लुबाडणूक केली.या प्रकाराची माहिती पत्रकार संदीप महाजन यांना मिळताच त्यांनी या विषयावर सखोल चौकशी केली आणि समाजमाध्यमांद्वारे, तसेच ‘ध्येय न्यूज’च्या माध्यमातून ही धक्कादायक बातमी सर्वांसमोर आणली. पत्रकारितेतील जबाबदारी आणि लोकहितासाठी त्यांनी दाखवलेली तत्परता पाहून ही बातमी काही वेळातच व्हायरल झाली. बातमीचा समाजावर, प्रशासनावर आणि संबंधित एजंटवर इतका परिणाम झाला की, संबंधित एजंटने काही मिनिटांत जवानाच्या खात्यावर 1600 रुपयांची रक्कम परत पाठवली.ही घटना ही केवळ पत्रकाराच्या सचोटीची विजयगाथा नाही, तर हे एक जिवंत उदाहरण आहे की सत्याचे धारदार लेखणीसमोर अन्याय करणाऱ्यांची लाचारी उघड होते. पत्रकार महाजन यांनी या प्रकरणात कोणत्याही आमिषाला बळी न पडता, केवळ सैनिकाचा हक्क परत मिळावा या हेतूने ही बातमी उघडकीस आणली.या प्रकरणानंतर शहरातील जनमानसात पत्रकार महाजन यांच्या कार्याची भरभरून स्तुती होत असून अनेकांनी सोशल मीडियावर “हीच खरी पत्रकारिता” असे म्हटले आहे. शिवाय, यामुळे भविष्यात या आणि अशाप्रकारे लूट करणाऱ्या अनधिकृत रेल्वे एजंटांचा धसका बसेल व सामान्य नागरिकांची लुबाडणूक टळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.प्रशासनाने सुद्धा या भामट्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. पत्रकारिता म्हणजे केवळ माहिती पोहोचवणे नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्याचे हत्यार आहे, याचे हे अत्यंत प्रभावी उदाहरण आहे.

Read More

लोहारा विकासो संस्थेत प्रजासत्ताक दिन साजरा.

प्रतिनिधी.गजानन क्षीरसागरलोहारा ता पाचोरा येथील लोहारा विकास संस्थेचे श्री पालीवाल यांचा निरोप समारंभलोहारा विविध कार्यकारी सहकारी संस्थेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.ध्वजारोहण व भारत मातेचे पूजन संस्थेचे व्हाईस चेअरमन ग.भा भागाबाई सरोदे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर संस्थेचे श्री दत्तात्रेय नथू पालीवाल हे रासायनिक खत विभाग व धान्य विभागामध्ये गोडाऊन कीपर म्हणून कार्यरत होते त्यांचा आज रोजी संस्थे मार्फत निरोप समारंभ साजरा करण्यात आलात्यांचा सत्कार चेअरमन प्रभाकर चौधरी यांनी शाल ,श्रीफळ व कपडे देऊन त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला.संस्थेने छोटेसे मानधन म्हणून रुपये 24 हजार रुपयाचा धनादेश संस्थेचे संचालक विकास देशमुख यांच्या हस्ते दिला यावेळी संस्थेचे चेअरमन प्रभाकर चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांनी पन्नास वर्षाचा कार्यकाळ हा संस्थेच्या हितासाठी घालवला व विश्वासाने व एकनिष्ठ ने कामकाज पाहिले या संस्थेच्या भरभराटीत त्यांचे फार मोठे योगदान आहे त्यांना पुढील आयुष्य सुखाचे व आनंदाचे जावो अशा शुभेच्छा दिल्या तसेच आपले लोहारा येथील सैनिक संदीप सुधाकर बाविस्कर यांनी लोहारा गावातील सैनिक सुट्टीवर येऊन पुन्हा ड्युटीवर जाण्यासाठी रेल्वे स्टेशन पर्यंत 50 किलोमीटरचा प्रवास रात्री अपरात्री करताना वाहनाची गरज भासत होते हे लक्षात घेऊन त्यांनी सर्वांना मोफत प्रवास करता येईल अशी इको व्हॅन उपलब्ध करून दिली त्या बद्दल लोहारा संस्थेने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे चेअरमन संचालक सर्व स्टॉप गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ व शेतकरी सभासद उपस्थित होते.

Read More

लोहारा तालुका पाचोरा परिसरातील सरसकट नुकसानीचे पंचनामे सुरू

प्रतिनिधी.गजानन क्षीरसागर लोहारा ता पाचोरा परिसरातील परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते त्यामध्ये कापूस सोयाबीन मका ज्वारी इत्यादी पिकांचा तोंडी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला होता त्याबाबत शासन स्तरापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या तक्रारी शासन दरबारी गेल्यामुळे आज प्राथमिक नुकसान अहवाल दिनांक 23/10/2024 रोजी तलाठी मोहन कुलकर्णी लोहारा ,कृषी सहाय्यक आर एच जोहरे, कृषी सहाय्यक रोहिणी पाटील, यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन मका /कापूस, पिकाचे पंचनामे केले यावेळी शेतकरी देवबा चौधरी, राजू सुर्वे नंदू सुर्वे भास्कर भोई अनिल तडवी विशाल पवार दीपक राजपूत इत्यादी व शेतकरी वर्ग हजर होते पंचनामे सर्वांचे सरसकट केले जातील असे तलाठी व कृषी सहाय्यक यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

Read More
error: Don't Try To Copy !!