प्रभाग क्रमांक 12 मधून राजू चौधरी इच्छुक

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर
प्रतिनिधी सुपडू जाधव
जामनेर शहरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून
अनेक इच्छुक उमेदवार आपले उमेदवारी पक्षाकडून जाहीर व्हावे अशी मागणी करत आहेत. परंतु वाकी रोडवरील रहिवासी व राजू ऑटो गॅरेज चे संचालक राजू ईश्वरलाल चौधरी हे कोणत्याही पक्षाला उमेदवारी न मागता प्रभाग क्रमांक 12 मधून अपक्ष उमेदवार म्हणून लढणार आहेत.
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर म्हणून राहिलेले राजू ईश्वरलाल चौधरी हे नेहमी सामाजिक कार्यात व इतरांच्या सुखदुःखात सहभागी असतात


सर्वांना परिचित असलेले राजू चौधरी हे एक व्यावसायिक असून त्यांचा चांगला जनसंपर्क आहे त्यामुळे त्यांनी कोणत्याही पक्षाकडे तिकीटाची सरळ मागणी न करता आपल्या परीने अपक्ष उमेदवार म्हणून आपण लढणार आहोत असे सांगितले. त्यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे प्रभागातील राजकिय समीकरण चांगलेच बदलू शकते राजू चौधरी यांच्या अपक्ष उमेदवारामुळे कोणाला फायदा व कोणाला तोटा होईल हे आता येणाऱ्या काळातच समजेल राजू चौधरी यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चा रंगू लागले आहे त्यामुळे समीकरणे हे निश्चित बदलणार आहेत.

error: Don't Try To Copy !!