भुसावळमध्ये 30 हजारांची लाच घेताना सहकार विभागातील अधिकारी व दोन लेखापरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

जळगाव, दि. 15 जून : भुसावळ येथील सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संबंधित एका प्रकरणात सहकार अधिकारी व दोन लेखापरीक्षकांना 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी भुसावळ शहरात करण्यात आली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला सावकारी व्यवसायासाठी आवश्यक परवाना काढायचा होता. त्यासाठी संबंधित कार्यालयात अर्ज केल्यानंतर परवाना मंजूर करून देण्यासाठी सहकार अधिकारी विजय विनायक गारूड (वर्ग-3) यांनी 20 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. तपासादरम्यान सुरेश जनार्दन विसपुते आणि हेमंत प्रकाश काळे या प्रमाणित लेखापरीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांसाठी व स्वतःसाठी मिळून 30 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.सोमवारी भुसावळ शहरातील नाहाटा चौफुली परिसरात सापळा कारवाईदरम्यान सुरेश विसपुते यांनी तक्रारदाराकडून 30 हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर एसीबीने त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी विजय गारूड, सुरेश विसपुते आणि हेमंत काळे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.

Read More

माळपिंपरी येथील कृषीदुतांनी मधुरम नर्सरीला दिली भेट. नर्सरी व्यवस्थापनाची माहिती घेतली जाणून.

जामनेर (प्रतिनिधी):- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील अंतिम वर्षातील कृषिदूत सुशांत जाधव, पवन बुवा , संग्राम पवार आणि सौरभ पाटील यांनी प्राचार्य डॉ. शैलेश तायडे आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम गोणशेटवाड , कार्यक्रम अधिकारी प्रो. व्हि.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मधुरम नर्सरी येथे भेट देऊन गट चर्चा प्रात्यक्षिक राबविले. मधुरम नर्सरीचे संचालक मा.श्री.योगेश पाटील यांनी रोपवाटिका (Nursery) व्यवस्थापन म्हणजे बियाणे, कलमे यांपासून रोपे तयार करणे, त्यांची योग्य निगा राखणे (पाणी, खत, कीटकनाशके), आणि योग्य पद्धतीने विक्री करणे यासाठीचे नियोजन होय. यशस्वी नर्सरीसाठी वनस्पतींची गरज, सिंचन, खत व्यवस्थापन, तापमान नियंत्रण, रोग-कीड नियंत्रण आणि मार्केटिंगचे ज्ञान आवश्यक आहे, ज्यात नियोजनबद्ध काम आणि रोपांविषयीची आवड यांची माहिती जाणून घेतली.

Read More

खान्देशचा झेंडा थेट ‘बिगबॉस मराठी ६’ मध्ये; शेंदुर्णीचा अहिराणी सुपरस्टार सचिन कुमावत यांची ऐतिहासिक एन्ट्री

शेंदुर्णी (ता. जामनेर | जि. जळगाव) –कलर्स मराठीवरील बहुचर्चित रिअॅलिटी शो ‘बिगबॉस मराठी – सिझन ६’ मध्ये खान्देशच्या मातीतून घडलेल्या एका कलाकाराने थेट महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या मनोरंजन मंचावर झेप घेत इतिहास रचला आहे. अहिराणी भाषेला राज्यभर ओळख मिळवून देणारे खान्देशचा आवाज – सचिन विठ्ठल कुमावत यांनी काल (११ जानेवारी) भव्य उद्घाटन सोहळ्यात बिगबॉसच्या घरात प्रवेश करत संपूर्ण खान्देशचा अभिमान वाढवला.अभिनेता रितेश देशमुख यांच्या होस्टिंगमध्ये सुरू झालेल्या या सिझनच्या पहिल्याच दिवशी सचिन कुमावत यांच्या दमदार आणि आत्मविश्वासपूर्ण एन्ट्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ग्रामीण भागातून आलेला कलाकार अहिराणी भाषेचा अभिमान जपत मंचावर उभा राहिल्याने सोशल मीडियावरही त्यांच्या एन्ट्रीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेंदुर्णीसारख्या ग्रामीण भागातून कोणतेही राजकीय किंवा कौटुंबिक पाठबळ नसताना स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे सचिन कुमावत आजही आपल्या गावाशी, मित्रपरिवाराशी घट्ट नाळ जपून आहेत. साधेपणा आणि मातीशी नातं टिकवून ठेवणं हीच त्यांची ओळख आहे.सन २००५ मध्ये ‘आरं दाजीबा’ या पहिल्या अल्बमपासून संगीत प्रवासाला सुरुवात करणाऱ्या सचिन कुमावत यांनी गेल्या दोन दशकांत खान्देशी लोककलेला आधुनिक व्यासपीठावर नेले. ‘केसांवर फुगे’, ‘लगनमा मचाडू धूम’, ‘सावन महिना मा’, ‘पोरी तुना गजरा’, ‘वाडी वाडी चंदन वाडी’, ‘टमटम’, ‘मनी डार्लिंग’, ‘मामी तुमची मुलगी लय सुंदर’, ‘खान्देशनी जत्रा’ यांसारखी असंख्य गाणी सुपरहिट ठरली आहेत.विशेष म्हणजे ‘केसांवर फुगे’ या गाण्याने यूट्यूबवर २८७ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळवत अहिराणी–मराठी संगीत क्षेत्रात नवा इतिहास रचला. आज त्यांच्या यूट्यूब चॅनेलला एकूण १.२ बिलियनहून अधिक (१२० कोटींपेक्षा जास्त) व्ह्यूज मिळाले असून, ग्रामीण भागातून एवढे मोठे डिजिटल यश मिळवणारा ते पहिले खान्देशी कलाकार ठरले आहेत.आतापर्यंत २५० पेक्षा अधिक लाईव्ह स्टेज शो, ५०० हून अधिक खान्देशी-अहिराणी व्हिडीओ अल्बम, तसेच Music Marathi, 9X Marathi, मायबोली यांसारख्या वाहिन्यांवर सातत्याने सादरीकरण असा त्यांचा कलात्मक प्रवास थेट बिगबॉसच्या घरापर्यंत पोहोचला आहे. याशिवाय लवकरच प्रदर्शित होणारा “ज्याची करावी कीव तोच घेतो जीव” हा त्यांचा आगामी चित्रपटही प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत आहे.खान्देश भूषण, गिरणा गौरव, गोदा सन्मान, महाराष्ट्राचा Reel Star Award यांसारख्या अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या सचिन कुमावत यांच्या कारकिर्दीत बिगबॉस मराठी हे आणखी एक सुवर्णपान जोडले गेले आहे.सचिन कुमावत यांची ही एन्ट्री केवळ एका कलाकाराचे यश नसून, संपूर्ण खान्देश आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रतिभेचा विजय असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

Read More

निवडणुकांचा वाजला बिगूल 2 डिसेंबरला मतदान 3 डिसेंबरला निकाल

1.आज पासून आचारसंहिता सुरू2.१० नोव्हेंबरला नामनिर्देशक पत्र भरता येणार.3.आयोगाच्या वेबसाईटवर इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज भरू शकतील.4.निवडणूक ईव्हीएम द्वारा होणार.5.१ कोटी ७ लाख ३हजार ५७६ मतदार हक्क बजावतील.6.दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार असणार-आयोग7.१७ नोव्हेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख8.२ डिसेंबरला मतदान,३ डिसेंबरला मतमोजणी.9.मतदारांच्या सोयीसाठी मोबाईल ॲप निवडणूक आयोग10.मतदारसंघ निहाय मतदार याद्या ७ नोव्हेंबरला प्रसिद्ध होतील*.11.२४६नगरपरिषदा ४२ नगरपंचायती निवडणुकांची घोषणा12.उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी तारीख २१ नोव्हेंबर २०२५13.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम तारीख १७ नोव्हेंबर

Read More

ईद-ए-मिलाद उत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा

Jbn न्यूज जामनेर प्रतिनिधी दिनांक 5/09 20025 सोयगाव तालुक्यातील सावळदबारा गावामध्ये मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद-उन-नबीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. सकाळी मुस्लिम बांधवांनी मशिदींमध्ये एकत्र जमून नमाज अदा केली. त्यानंतर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनकार्याची आठवण करून देण्यात आली. तसेच गावातून शोभायात्रा काढण्यात आली. या जुलूसामध्ये मुलांनी धार्मिक झेंडे, फलक घेऊन सहभाग घेतला. ठिकठिकाणी गावात नागरिकांनी गुलाबपुष्प वर्षाव करून एकमेकांना पेढे वाटप करून जुलूसाचे स्वागत केले.शांती, बंधुभाव आणि ऐक्याचा संदेश देत हा उत्सव पार पडला. आणि संकाळी धार्मिक व्याख्याने, कव्वाली तसेच मिलाद शरीफचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमानंतर मुस्लिम बांधवांनी व नागरिकांनी एकत्र येऊन शिरखुर्मा गोड जेवण व विविध पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेतला. या संपूर्ण उत्सवामध्ये ज्येष्ठ नागरिक शब्बीर सेट सरपंच आरिफ लोकमान शिवाप्पा चोपडे,ईश्वर कोळपे, मोहम्मद तालीम मोहम्मद अफसर मोहम्मद अस्लम आसिफ शेख रियाज शेख सामाजिक कार्यकर्ते जीवन कोलते, गणेश खैरे पोलीस पाटील विलास कुल्ली रोशन मोहम्मद गफार तडवी कदिर तडवी अशपाक मोहम्मद दिलीप देशमुख सुनील चोरमाले पत्रकार बंधू व सर्व गावातील नागरिक यांनी कार्यक्रमात आनंद व्यक्त केलातसेच कुणाला गालबोट लागणार नाही याची खबरदारी घेत पोलीस कर्मचारी जमादार मिरखा तडवी शिवदास गोपाळ व त्यांचे सवंगडी होमगार्ड यांनी चोक बंदोबस्त दिला होता

Read More

जामनेर – भारतीय जैन संघटना जामनेर शाखा याच्या तर्फे पितृ दिवस निमित्त

दि.15 जूनला पितृ दिवस निमित्त“यु डोन्ट नो माय डैड”*[“तुम मेरे पापा को नही जानते”] वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते।वक्तृत्व स्पर्धामधे 30 स्पर्धकानी सहभाग घेतला होता आणिसर्वानी प्रेम आणि उत्साहात आपापल्या वडिलांच्या बाबतीत काही कटु कही गोड अनुभव सर्वांसमोर मांडले।स्पर्धेचे निकाल दोन सन्माननीय अतिथी डॉ. पराग पाटील एवं राजुलजी शाह यांनी काढले। त्यांचा पण सत्कार आणि सन्मान केला गेला।या कार्यक्रमाचे प्रायोजक स्व.रतनलालजी मुलचंदजी कोठारी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री इन्दरचंदजी रूपेशकुमारजी कोठारी परिवार,जामनेर यानी केले होते।या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट हेड विकास कोठारी, कुशल बोहरा,सौ.मोना चोरडिया,सौ मनीषा कोठारी यांनी कार्यक्रमात पूर्ण योगदान दिले।स्पर्धेचे विजयी सदस्याना प्रथम पुरस्कार ₹500 द्वितीय पुरस्कार ₹300 तृतीय पुरस्कार ₹200 याप्रमाने तीन्ही गृप मधे वितरित केले।सर्व विजयी प्रतिस्पर्धी चे नाव खालील प्रमाणे आहेग्रुप 1

Read More

छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरास जिल्हाधिकारी यांची उपस्थिती

नेरी दिगर (ता. जामनेर) | दिनांक ०४ जून २०२५ रोजी महसूल मंडळ नेरी अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर ग्रामपंचायत नेरी दिगर येथील महादेव मंदिर सभामंडपात मोठ्या उत्साहात व व्यापक जनसहभागातून संपन्न झाले. या शिबिरात विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जळगाव जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल, उपविभागीय अधिकारी श्री विनय गोसावी यांच्यासह सर्व विभागांचे तालुका प्रमुख उपस्थित होते. शिबिराची सुरुवात उपविभागीय अधिकारी श्री विनय गोसावी यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी शिबिराच्या उद्दिष्टांबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी नागरिकांसमोर आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “राजस्व समाधान शिबिरे ही सेवा पुरवठ्यापेक्षा अधिक असून, शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा सशक्त करण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे.” मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी अशा शिबिरांच्या फलश्रुतीवर भर देत सांगितले की, “ग्रामस्तरावर अशा उपक्रमांमुळे योजनांची अंमलबजावणी कृतीशीलपणे होते व लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचते.” शिबिरातील विभागनिहाय लाभ: ठळक उपक्रम: कार्यक्रमाची सांगता तहसीलदार श्री नानासाहेब आगळे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. त्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व विभागप्रमुख, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे आभार मानले.

Read More

जामनेर तालुक्यातील तेली समाजाचे निस्वार्थ समाजसेवक अजय भाऊ अशोक चौधरी यांची महाराष्ट्रात मोठ्या पदावर नियुक्ती!

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी सुपडू जाधव जामनेर तालुक्यातील तेली समाजाच्या निस्वार्थ समाजसेवेसाठी सतत कार्यरत असलेल्या अजय भाऊ अशोक चौधरी यांची श्री संताजी नवयुवक मंडळ, महाराष्ट्र राज्य या प्रतिष्ठित संस्थेच्या उत्तर महाराष्ट्र प्रसिद्ध प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषजी घाटे साहेब यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत चौधरी यांची ही नियुक्ती जाहीर केली. अजय भाऊ चौधरी यांनी तेली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक कार्यासाठी अनेक वर्षे निस्वार्थ सेवा दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या हिताचे अनेक उपक्रम राबवले गेले आहेत. यावेळी संस्थेचे माहिती अध्यक्ष श्री भटू पुंडलिक नेरकर यांनीही अजय भाऊ चौधरी यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या नियुक्तीमुळे जामनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण असून समाजातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!