जामनेर, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात जिकरा एज्युकेशन सोसायटी संचलित जिकरा न्यू उर्दू माध्यमिक विद्यालय, जामनेर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयाचा एकूण निकाल 98.40 टक्के लागल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परीक्षेत कु. मिसबाह आसिफ शेख हिने 84.80 टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला. कु. अहेनिश नईम खान हिने 83.40 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर मोहम्मद अकदस निसार अहमद यांनी 83.20 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक संपादन केला.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रहीम शेख तसेच सचिव जाकीर शेख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाचे प्राचार्य इरशाद खान सर व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन करून त्यांच्या यशात मोलाचा वाटा उचलला. तसेच संस्थेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला असून परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
