
Maharashtra

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर दक्षता पथकांची होणार स्थापना
मुंबई, : राज्यातील बांधकाम कामगारांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून त्यांच्याकडून आर्थिक फसवणूक करण्यासह शासनाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या बोगस बांधकाम कामगार आणि दलालांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध भागातून लोकप्रतिनिधी व बांधकाम कामगारांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नोंदणी, कीट वाटप व अन्य बाबतीत गैरप्रकार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून आता राज्यभरात जिल्हास्तरावर कामगारांची पडताळणी करण्यासाठी दक्षता पथके स्थापन करून प्रभावी तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक विभागात, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कार्यालय प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र जिल्हास्तरीय दक्षता पथक गठीत करण्यात येणार आहे. या पथकांचे कार्यक्षेत्र मात्र त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्याऐवजी दुसऱ्या जिल्ह्यावर असेल, जेणेकरून कारवाई अधिक निष्पक्ष आणि प्रभावी राहील. दक्षता पथकांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे होणारी नोंदणी, नोंदणीसाठी पैसे मागण्याचे प्रकार तसेच खोटे दाखले सादर करून मिळविले जाणारे लाभ या बाबींवर लक्ष केंद्रित करून तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. संबंधित दलालांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल. या मोहिमेसाठी क्षेत्रीय कार्यालयांना वाहन भाडेतत्वावर घेण्याची परवानगी देण्यात आली असून, तपासणीसाठी आवश्यक इतर खर्चही प्रशासकीय निधीतून नियमानुसार करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय दक्षता पथक प्रमुखांनी त्यांच्या कारवाईचा सविस्तर अहवाल विभागीय प्रमुखांना सादर करावयाचा आहे. विभागीय प्रमुख सर्व जिल्ह्यांचे अहवाल एकत्र करून आपल्या अभिप्रायासह मंडळ मुख्यालयास सादर करतील.ही विशेष तपासणी मोहीम प्रथम टप्प्यात १० जुलै, २०२५ अखेरपर्यंत राबविली जाणार आहे. या तपासणी दरम्यान ज्यांना काही तक्रारी असतील त्यांना त्या दक्षता पथकाकडे देता येतील. प्रत्येक पथकाने दरमहा किमान एक तपासणी करणे बंधनकारक असून, त्या तपासण्यांचे संकलित अहवाल मंडळास दरमहा सादर करणे आवश्यक राहील. या निर्णयामुळे राज्यातील बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर प्रभावी आळा बसेल, अशी अपेक्षा कामगारमंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली आहे.

खाजगी क्लासमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; राज्य महिला आयोगाने घेतली तात्काळ दखल
बीड (प्रतिनिधी):बीड जिल्ह्यातील एका खाजगी क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा दोन प्राध्यापकांनी विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने संबंधित पोलिसांना तातडीचे निर्देश दिले आहेत. राज्य महिला आयोगाने बीड पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून, संबंधित क्लासचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ ताब्यात घ्यावे, आरोपींना अटक होईपर्यंत क्लासची इमारत सील करावी, आणि इतर विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडूनही अशा प्रकारच्या तक्रारी असल्यास त्याचा संवेदनशीलतेने तपास करावा, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच पीडित मुलीच्या तक्रारीची गंभीरतेने दखल घेऊन तिचे समुपदेशन करण्यात यावे, अशी ही शिफारस आयोगाने केली आहे. आयोगाच्या अध्यक्षा यांच्या निर्देशानुसार हे पत्र पाठवण्यात आले असून, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना या प्रकरणी त्वरित कारवाई करून अहवाल आयोगाकडे पाठवण्यास सांगितले आहे. राज्य महिला आयोगाच्या सचिव दुर्गा माळी यांनी पाठवलेल्या या पत्रात, महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील अशा घटनांमध्ये तत्काळ आणि नियमबद्ध कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी तपास पथक तयार करण्यात आले आहे.

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत बस पास योजना” अंतर्गत शालेय विद्यार्थिनींना बस पास वाटप – जामनेर आगार आपल्या दारी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
जामनेर, ता. २६ जून – महाराष्ट्र शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत बस पास वाटप योजने” अंतर्गत आज मोराड, बिलवाडी आणि मेणगाव या गावांमध्ये “जामनेर आगार आपल्या दारी” या अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थिनींसाठी बस पासचे वाटप करण्यात आले. स्नेहदीप गरुड फाउंडेशन आणि जामनेर बस आगार यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या उपक्रमात गावोगावी विद्यार्थिनींसाठी मोफत बस पास वितरणाची व्यवस्था करण्यात आली. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी आवश्यक असणारी सुरक्षित व सुलभ प्रवास सेवा मिळणार आहे. कार्यक्रमास युवानेते स्नेहदीपभाऊ संजय राव गरुड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्यासोबत गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, पोलीस पाटील, तसेच गरुड महाविद्यालयाचे मुख्याध्यापक र.एस. चौधरी सर व सहकारी शिक्षक, गावातील प्रतिष्ठित पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जामनेर बस आगार तसेच शेंदुर्णी बस स्थानकाचे प्रतिनिधी श्री. भारुडे व मनोज पाटील यांनी विद्यार्थिनींना योजना आणि प्रवास व्यवस्थेबाबत माहिती दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना शिक्षणात अधिक संधी प्राप्त होणार असून, शासनाच्या या उपक्रमाचा ग्रामीण भागात सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

‘योग करा, निरोगी रहा’ मंत्राने इंदिराबाई ललवाणी विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा
जामनेर, दि. २१ जून २०२५ –इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,जामनेरपुरा येथे अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. सकाळी ७ वाजता शासकीय प्रोटोकॉलनुसार योग सत्राला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. समीर घोडेस्वार यांनी करताना “करो योग, रहो निरोग” या संकल्पनेवर आधारित योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावले. या कार्यक्रमात ओंकार, प्रार्थना, विविध योगासन, प्राणायाम, फेसिंग योग, हास्य योग, टाळ्यांचा व्यायाम आणि ध्यान यासारख्या अनेक प्रकारांचे सविस्तर प्रात्यक्षिक प्रा. समीर घोडेस्वार यांनी दिले. विद्यार्थ्यांनी या सर्व कृती हसत-खेळत आत्मसात केल्या. प्रा.दिनेश महाजन यांनी संतुलित आहाराचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम समजावून सांगितले, तर प्रा.सुमित काबरे यांनी फास्ट फूड व पॅकबंद पदार्थांचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांसमोर मांडले. कार्यक्रमास मुख्याध्यापक एस.आर. चव्हाण, उपमुख्याध्यापक एस.एन. चवरे, उपप्राचार्य प्रा.के.एन.मराठे, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.के.डी. निमगडे, पर्यवेक्षक प्रा.जी.जी.अत्तरदे, माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक व्ही.जी.महाजन, पर्यवेक्षक पी.पी.चौधरी यांची विशेष उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन क्रीडा विभाग प्रमुख जी.सी.पाटील यांनी तर आभार प्रदर्शन बी.पी.बेनाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशामध्ये आर जी चौधरी, किशोर चौधरी, प्रितेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले. योग हा भारतीय संस्कृतीचा आत्मा असून तो नियमित केल्यास विद्यार्थी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम होतील, असा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.

पळासखेडे मिराचे येथे विकसित भारत का अमृत काल सेवा ११ सालनिमित्त पंचायत चौपाल सभेचे
पळासखेडे(प्रतिनिधी)जामनेर तालुक्यातील पळासखेडे मिराचे येथे विकसित भारत का अमृत काल सेवा सुशासन गरीब कल्याण के ११ साल निमित्त पंचायत चौपाल सभेचे आयोजन करण्यात आले होते मा ना पंत प्रधान नरेंद्र जी मोदी सरकारने भारतीय जनते साठी केलेल्या कल्याणकारी योजना हिताची कामे देश्याला प्रगती पथावर नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची माहिती वक्त्यांनी दिली राम मंदीर ३७० कलम ऑपरेशन सिंदूर अश्या अनेक गोष्टी उपस्थीत नागरिकांसमोर मांडल्या.कार्यक्रमांचे अध्यक्ष स्थानी प्रा शरद पाटील होते तर जामनेर पश्चिम मंडल अध्यक्ष कमलाकर भाऊ पाटील गट नेते अमर भाऊ पाटील अण्णा भाऊ पिठोडे संजय निराधार चे अध्यक्ष भगवान भाऊ इंगळे भैय्या शेठ अस्लम शेख अन्वर शेख शबीर शेख आशिष भाऊ रवी भाऊ पाचपोळे निवृत्ती भाऊ पाटील गोविंद भाऊ राजपूत संजय भाऊ पवार मंगल राजपूत अर्जुन मगर अरुण पवार विजू भाऊ पाटील व इतर मंडळी उपस्थित होते सूत्र संचालन रवि हडप यांनी केले तर आशिष दामोदर यांनी आभार व्यक्त केले

आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत भुसावळ येथे ‘योग संगम’ कार्यक्रमाचे आयोजन
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून “एक पृथ्वी, एक स्वास्थ्य के लिए योग” या धरतीवर या वर्षीचा ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन च्या “योग संगम” कार्यक्रमाचे आयुष मंत्रालय, भारत सरकार, सेंट्रल रेल्वे, भुसावळ विभाग व जिल्हाधिकारी जळगाव आणि भारतीय खेळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत, भुसावळ येथील सेन्ट्रल रेल्वे मैदान येथे दि.२१ जून रोजी सकाळी ६ वा. आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री श्री.संजयजी सावकारे, भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे, जळगाव जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, भारतीय खेळ प्राधिकरण क्षेत्रीय निदेशक श्री.पांडुरंग चाटे, श्री. राजेंद्र फातले यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे. सदर ‘योग संगम’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भुसावळ शहर व परिसरातील इच्छुक नागरिकांनी दि.२१ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या आधी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अंशतः अनुदानित शिक्षकांना मोठा दिलासा! मुख्यमंत्री फडणवीस यांचा शब्द – ‘शिक्षकांना न्याय मिळणार’आ. किशोर दराडे सत्यजित तांबे यांच्या पुढाकाराने शिक्षक आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक; अधिवेशनात तोडग्याची हमी
नाशिक (प्रतिनिधी) – राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांच्या लढ्याला मोठे यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक विभागाचे शिक्षक आमदार आ. किशोर दराडे सत्यजित तांबे यांच्या आग्रही पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिक्षक आमदारांची निर्णायक बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ठाम शब्द देत, “शिक्षकांवर अन्याय होणार नाही. शासनाकडून विलंब झाला असला, तरी यंदाच्या अधिवेशनात शिक्षकांना निश्चित दिलासा मिळेल,” अशी ग्वाही दिली.आ. किशोर दराडे यांचा आक्रमक पाठपुरावाशिक्षकांच्या मागण्यांसाठी आ. किशोर दराडे यांनी नाशिकमध्ये शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी थेट राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला. आ. सत्यजित तांबे, विक्रम काळे आ. किरण सरनाईक आणि आ. जयंत तासगावकर यांच्यासह त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आणि शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना गती देण्याची मागणी केली.मुख्यमंत्र्यांचे आश्वासनमुख्यमंत्र्यांनी 14 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर झालेल्या 20% वाढीव वेतन अनुदानाच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी रखडल्याची बाब मान्य केली. “लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल,” असे सांगत त्यांनी शिक्षकांना दिलासा दिला. आगामी अधिवेशनात आर्थिक आणि प्रशासकीय अडथळे दूर करून शिक्षकांच्या मागण्यांवर ठोस तोडगा काढण्याचे प्राधान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.शिक्षकांमध्ये नव्या आशेचा संचारमुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे आंदोलनात सहभागी शिक्षकांमध्ये उत्साह आणि नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे. नाशिकसह राज्यभरातील शिक्षक संघटना एकजुटीने लढत असून, आ. किशोर दराडे यांच्या राजकीय पाठबळामुळे आंदोलनाला बळ मिळाले आहे. अधिवेशनात शिक्षकांना न्याय मिळण्याची अपेक्षा आता वाढली आहे.‘शिक्षकांचा लढा यशस्वी होणार!’या सकारात्मक घडामोडींमुळे शिक्षकांचा आवाज आता शासनापर्यंत पोहोचला असून, अधिवेशनातील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.यासाठी महासंघाचे अध्यक्ष डॉ संजय शिंदे , ‘शिक्षक सेना प्रा. संजय चव्हाण ,शिक्षक समन्वय संघाच्या वतीने अनिल परदेशी, सुभाष पवार, कर्तरसिंग ठाकूर, रवी पवार ,प्रकाश तायडे, तसेच जुक्टो संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील गरुड ,शैलेश राणे ,नंदन वळींकार, सुनील सोनार यासह मोहन चकोर आधी पदाधिकारी यांनी आमदार किशोर दराडे, सत्यजित तांबे, विक्रम काळे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

जामनेर – भारतीय जैन संघटना जामनेर शाखा याच्या तर्फे पितृ दिवस निमित्त
दि.15 जूनला पितृ दिवस निमित्त“यु डोन्ट नो माय डैड”*[“तुम मेरे पापा को नही जानते”] वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते।वक्तृत्व स्पर्धामधे 30 स्पर्धकानी सहभाग घेतला होता आणिसर्वानी प्रेम आणि उत्साहात आपापल्या वडिलांच्या बाबतीत काही कटु कही गोड अनुभव सर्वांसमोर मांडले।स्पर्धेचे निकाल दोन सन्माननीय अतिथी डॉ. पराग पाटील एवं राजुलजी शाह यांनी काढले। त्यांचा पण सत्कार आणि सन्मान केला गेला।या कार्यक्रमाचे प्रायोजक स्व.रतनलालजी मुलचंदजी कोठारी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री इन्दरचंदजी रूपेशकुमारजी कोठारी परिवार,जामनेर यानी केले होते।या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट हेड विकास कोठारी, कुशल बोहरा,सौ.मोना चोरडिया,सौ मनीषा कोठारी यांनी कार्यक्रमात पूर्ण योगदान दिले।स्पर्धेचे विजयी सदस्याना प्रथम पुरस्कार ₹500 द्वितीय पुरस्कार ₹300 तृतीय पुरस्कार ₹200 याप्रमाने तीन्ही गृप मधे वितरित केले।सर्व विजयी प्रतिस्पर्धी चे नाव खालील प्रमाणे आहेग्रुप 1

छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरास जिल्हाधिकारी यांची उपस्थिती
नेरी दिगर (ता. जामनेर) | दिनांक ०४ जून २०२५ रोजी महसूल मंडळ नेरी अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर ग्रामपंचायत नेरी दिगर येथील महादेव मंदिर सभामंडपात मोठ्या उत्साहात व व्यापक जनसहभागातून संपन्न झाले. या शिबिरात विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जळगाव जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल, उपविभागीय अधिकारी श्री विनय गोसावी यांच्यासह सर्व विभागांचे तालुका प्रमुख उपस्थित होते. शिबिराची सुरुवात उपविभागीय अधिकारी श्री विनय गोसावी यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी शिबिराच्या उद्दिष्टांबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी नागरिकांसमोर आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “राजस्व समाधान शिबिरे ही सेवा पुरवठ्यापेक्षा अधिक असून, शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा सशक्त करण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे.” मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी अशा शिबिरांच्या फलश्रुतीवर भर देत सांगितले की, “ग्रामस्तरावर अशा उपक्रमांमुळे योजनांची अंमलबजावणी कृतीशीलपणे होते व लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचते.” शिबिरातील विभागनिहाय लाभ: ठळक उपक्रम: कार्यक्रमाची सांगता तहसीलदार श्री नानासाहेब आगळे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. त्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व विभागप्रमुख, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे आभार मानले.

प्रॉपर्टी डीलर म्हणून ओळख असलेल्या रामेश्वर नथू बिजागरे यांची गळफास घेऊन आत्महत्या
जामनेर तालुक्यात मंगळवारी दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली. प्रॉपर्टी डीलर म्हणून ओळख असलेल्या रामेश्वर नथू बिजागरे (वय 40, रा. चिंचखेडा तवा) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एका मित्राला फोन करून ही माहिती दिली होती, मात्र मदतीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, रामेश्वर बिजागरे हे लाखोंच्या जमिनीच्या व्यवहारांमुळे जामनेर परिसरात परिचित होते. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे जामनेर-बोदवड रोडवरील भवानी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. नंतर काही मित्रांसह धाब्यावर जेवणही केले. त्यानंतर त्यांनी एका निकटवर्तीय मित्राला फोन करून “आपण आत्महत्या करत आहे,” असे सांगितले. संबंधित मित्राने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु काही वेळाने त्यांचा फोन बंद यायला लागला. यानंतर मित्रांनी लोकेशनवरून शोध घेत भवानी घाट परिसर गाठला असता, बिजागरे यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृत्यूपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, या चिठ्ठीत काही व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली असून, पैशांचे व्यवहार, देणे-घेणे यांचा उल्लेख असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, मृत्यूमागील कारणे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. रामेश्वर बिजागरे यांनी अल्पावधीतच आर्थिक प्रगती केली होती. प्रॉपर्टी डीलिंगच्या माध्यमातून त्यांचे अनेकांशी व्यवहार होते. या व्यवहारांमुळे मानसिक तणाव होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे चिंचखेडा गावात तसेच जामनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.