जामनेरात स्विमिंग पुलाच्या आउटलेट असलेल्या चेंबर मध्ये ५ वर्षाच्या मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू.दर्शनपार्क व एकुलती गावावर शोककळा.

जामनेर (प्रतिनिधी):- येथील सोनेश्वर मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या स्विमिंग पुलाच्या आउटलेट असलेल्या हौदात ५ वर्ष वय असलेल्या कार्तिक ऊर्फ उत्कर्ष गणेश पाटील या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दी.३ रोजी संध्याकाळी ठीक ५ ते ६ वाजेच्या सुमारास घडली आहे.
त्याचे सविस्तर असे की, मूळचे एकुलती येथील रहिवाशी व हल्ली दर्शन पार्क येथे स्थाईक असलेले व संजय दादा गरूड यांच्या संस्थेत तोंडापूर येथे क्लार्क म्हणून कार्यरत असलेले गणेश पाटील हे आपल्या ५ वर्षाच्या कार्तिक व आपल्या मुलीसह स्विमिंग पुलात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते. संध्याकाळी पोहण्याचा आनंद घेतल्या नंतर ते ओले झालेले कपडे बदलवण्यासाठी आपल्या मुलांना घेऊन रूम मध्ये गेले होते. मात्र कार्तिक हा त्यांची नजर चुकवून आउटलेटचे वाहते पाणी बघून त्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी पुढे पुढे जात आउटलेटचे पाणी ज्या ठिकाणी जमा होते. त्या चेंबर पर्यन्त गेला असता त्याचा चेंबर मध्ये तोल जाऊन तो चेंबर मध्ये असलेल्या पाण्यात बुडाल्याची माहिती स्थानिक रहिवाश्यांनी दिली असून एक मिनिटही न सोडणाऱ्या गणेश पाटील व त्यांच्या फॅमिलिवर मात्र कार्तिकच्या जाण्याने वज्रघात झाला आहे. या ठिकाणी घडलेल्या घटनेची चर्चा होताच कार्तिकला शोधण्यासाठी बरेच लोक स्विमिंग पुलाच्या पाण्यात उतरून शोध घेत होते. मात्र आउटलेटच्या पाण्याकडे कोणाचेही लक्ष न गेल्याने कार्तिकला शोधायला बराच वेळ लागला त्यामुळे त्याला जीवदान देता आले नाही. अशी खंत उपस्थित शोध कार्य करणाऱ्या लोकांनी व्यक्त केली आहे. तरीही त्याठिकाणी सुरक्षितता म्हणून ज्या ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. त्यांचे ट्रेनर वा सिक्युरिटी गार्ड त्या ठिकाणी नसल्याची चर्चा शहरात होतांना दिसून येत आहे. कदाचीत त्यामुळे कार्तिक चा जीव वाचवता आला असता अशी खंत व्यक्त करतांना जामनेर नागरीक दिसून येत आहे.कार्तिक च्या पच्च्यात आई, वडील, काका, आजी, आजोबा, काका,काकू आणि ११ वर्षाची बहीण असा परिवार आहे.

error: Don't Try To Copy !!