शहापूर येथे घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ; २०८ लाभार्थ्यांना ऑनलाईन पासचे वितरण

शहापूर (ता. जामनेर) | प्रतिनिधीजामनेर तालुक्यातील शहापूर गावात घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी मा. विनय गोसावी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ऑनलाईन पद्धतीने ETP पास जनरेट करून खडकी नदीपात्रातून वाळूचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामार्फत घरकुल बांधणीसाठी आवश्यक वाळू सरकारी पातळीवरून मोफत देण्यात येत असून, गरजू लाभार्थ्यांना या सुविधेचा थेट लाभ मिळाला आहे. एकूण २०८ लाभार्थ्यांना ऑनलाईन पासेस वितरित करण्यात आले. उपस्थित मान्यवर:या कार्यक्रमावेळी तहसीलदार जामनेर, गटविकास अधिकारी जामनेर, ग्राम महसूल अधिकारी शहापूर, ग्रामपंचायत अधिकारी शहापूर, पोलीस पाटील शहापूर, व घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तांत्रिक पारदर्शकता आणि सुलभता:ETP प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली गेली असून लाभार्थ्यांनी शासनाच्या या सुविधेचे स्वागत केले आहे. गावकऱ्यांनी या उपक्रमामुळे घरकुल बांधणीला गती मिळेल, अशी भावना व्यक्त केली.

Read More

“बोधगया मुक्तीच्या लढ्यासाठी जळगावात आंदोलन

जळगाव | बोधगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा, या मागणीसाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क व इतर बौद्ध संघटनांनी एकत्र येत जळगावात जनजागृती मोहीम उघडली आहे. या लढ्याचा एक भाग म्हणून दि. ८ मार्च २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे कार्यकर्ते प्रचारासाठी शहरात परिश्रम घेत आहेत. सुमित्र अहिरे, रविंद्र बाविस्कर व विक्रम जावे यांनी त्रिभुवन कॉलनी, के.सी. पार्क, महामाया बुद्धविहार, आंबेडकर नगर, प्रबुद्धनगर पिंप्राळा, शंकरआप्पा नगर या भागात जाऊन जनजागृती केली. संघटनेच्या म्हणण्यानुसार, “बोधगया महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.” आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

भुसावळला भारतीय बौद्ध महासभेचे “जिल्हा महीला कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर”

भुसावळ :- येथे दि.२८/१०/२४ सोमवारी भारतीय बौद्ध महासभा, जळगांव पुर्व अंतर्गत प्रथमच “महीला कार्यकर्ता प्रक्षिक्षण “शिबीराचे शिलरत्न बुद्ध विहार, झे टी सी रोड , सात नंबर पोलिस चौकी मागे,भुसावळ या ठिकाणी सकाळी १०ते ४ वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे.या शिबीराचे अध्यक्ष महिला जिल्हा अध्यक्ष प्रियंका अहिरे हया राहतील तर शिबीराचे प्रमुख मार्गदर्शिका महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संस्कार विभागाचे स्वाती गायकवाड हे राहतील आणि प्रमुख उपस्थतीमध्ये राज्य संघटक लताताई तायडे, के. वाय. सुरवाडे, जिल्हा सरचिटणीस वैशालीताई सरदार, जिल्हा कोषाध्यक्ष कल्पना तायडे, जिल्हा अध्यक्ष रविंद्र वानखेडे, जिल्हा सरचिटणीस सुशिलकुमार हिवाळे, शैलेन्द्र जाधव हे उपास्थित रहाणार; आहेत.तरी जिह्यातील सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या महीला पदाधिकारी व कार्यकर्त्या यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे असे आव्हान जिल्हा संघटक, वनमालाताई हिवाळे यांनी केले आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!