निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार एस.एस.सी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

पळसखेडे मिराचे, प्रतिनिधी : धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी, शेंदुर्णी संचलित निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय, पळसखेडे मिराचे येथे फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेत सेमी व मराठी माध्यमातून प्रथम पाच क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज दि. 9 मे रोजी उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री व्ही. आर. पाटील सर प्रमुख उपस्थित होते. तसेच इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक श्री व्ही. डी. पाटील सर, श्री जी. पी. पाटील सर, श्री पी. के. राजपूत सर, श्री व्ही. ए. पाटील सर, सीनियर क्लार्क श्री के. आर. सोनवणे भाऊसाहेब तसेच ग्रंथपाल श्री डी. एस. बोरसे सर यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. यावेळी विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला.

प्रसंगी मुख्याध्यापक आदरणीय नानासाहेब यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत यशाची परंपरा कायम राखण्यासाठी मेहनत, सातत्य व शिस्त यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली.

कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते.

error: Don't Try To Copy !!