जामनेर (प्रतिनिधी): शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी जामनेर शहर कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, सरचिटणीस अतिश झाल्टे, शहर मंडळ अध्यक्ष रविंद्र रमेश झाल्टे, डॉ. प्रशांत भोंडे, दिपक तायडे, बाबुराव हिवराळे, सुहास पाटील, मुकुंदा सुरवाडे, दत्तू जोहरे, सुनील पाटील, प्रल्हाद सोनवणे, सुभाष पवार, गोकुळ माळी, पप्पू पाटील, दिपक डांगी, योगेश मोते आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी महाराणा प्रताप यांच्या पराक्रम, त्याग आणि स्वाभिमानाच्या आदर्शातून प्रेरणा घेत राष्ट्रसेवेचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमात राष्ट्रभक्तीचा उत्साहपूर्ण माहोल निर्माण झाला होता. 🚩
