टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू

टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू नायजेरियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पेट्रोल टँकरमध्ये झालेल्या भीषण स्फोटात ९४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत मृत्यांची संख्या आणखी वाढण्याची भीती आहे. ५० जण गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ही घटना उत्तर नायजेरिया येथील जिगावा राज्यातील एका गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल टँकरचा अपघात झाला होता. चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटल्याने हा टँकर रस्त्यात उलटला. यावेळी टँकरमधून पेट्रोलची गळती सुरू झाली,यावेळी पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी गर्दी केली. लोक पेट्रोल गोळा करत होते. यावेळी अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात ९४ जणांचा मृत्यू झाला. मिळालेली माहिती अशी, टँकर उलटल्यानंतर स्थानिक लोकांनी त्यातून पेट्रोल भरण्यास सुरुवात केली. त्यानंतर मोठा स्फोट होऊन आग लागली. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. ही घटना बुधवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताशी संबंधित एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये संपूर्ण परिसरात मोठी आग दिसत आहे. घटनास्थळी मृतदेह विखुरलेले दिसत आहेत. जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नायजेरियातील बहुतांश अपघात हे खराब रस्त्यांमुळे होतात. गेल्या महिन्यात, नायजेरियाच्या उत्तर-मध्य नायजर राज्यात इंधन टँकर आणि ट्रकची धडक झाली. टक्कर झाल्यानंतर एक स्फोट झाला, यामध्ये किमान ४८ जणांचा मृत्यू झाला होता. नायजेरियाच्या फेडरल रोड सेफ्टी कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये पेट्रोल टँकर अपघाताची १५०० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. या अपघातांमध्ये ५३५ जणांचा मृत्यू झाला तर १,१४२ जण जखमी झाले.

Read More

पाळधी गावातील मुख्य बस स्थानक गाड्यांचा वेग कमी करण्यासाठी रबर स्ट्रीप,रमबल्स किंव्हा गतिरोधक सारखी यंत्रणा बसविण्याबाबत ग्रामस्थांचे पहूर पोलिसात निवेदन.

आमचे पाळधी हे गाव जळगाव छत्रपती संभाजी नगर या महामार्गावर असून या गावात शिक्षणासाठी पाळधी गावासह परीसारतील सोनाला, भराडी, नाचणखेडा, भिलखेडा, सार्व, जोगलखेडा, लाखोली या गावातील विद्यार्थी हे श्रीमती क.द. नाईक माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येत असतात.तसेच बाहेर गावांना जाण्यासाठी देखील वरील गावातील ग्रामस्थ हे पाळधी गावात येत असतात. तसेच पाळधी गावात जिल्हा परिषद मुलांची शाळा व जिल्हा परिषद कन्या शाळा यामुख्य महामार्गाला लागून असल्याने गावातील तसेच साईनगर, शिवाजी नगर वाडी भाग येथील देखील लहान मुले हे शिकण्यासाठी येत असतात. गावातील ग्रामस्थ व शाळेत येणार विद्यार्थी यांना मुख्य बस स्थानक चौफुली व महाराणा प्रतापसिंह चौफुली याठिकाणी रस्ता ओलांडून जावे लागते. तसेच या महामार्गावर वाहनाची वर्दळ असल्याने येणारी व जाणारी वाहने हि जोरात असल्याने येणारी व जाणारी वाहने हि जोरात असल्याने या दोन्ही ठिकाणी या अगोदर देखील अपघात झाले असून जीवित हानी देखील झाली आहे. तरी आपण आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून सदरील महामार्ग कार्यालयात योग्य तो अहवाल सदर करून पाळधी गावतील दोन्ही ठिकाणी वाहनाचा वेग कमी करण्यासाठी यंत्रणा बसविण्याचे सांगावे. जर कोणतीही उपाय योजना न केल्यास भविष्यात जर काही अपघात झाला तर त्यास संपूर्ण पणे महामार्ग प्राधिकरण व रोड कॉन्ट्रॅक्टर हे जबाबदार राहतील. येणाऱ्या १० ते १५ दिवसात वेग कमी करण्यासाठी योग्य ती कामे न केल्यास ग्रामस्थ हे रास्ता रोको आंदोलन करतील व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण जबाबदार राहाल. निवेदनावर पाळधी गावातील ग्रामस्थ यांच्या सह्या आहेत.

Read More
error: Don't Try To Copy !!