जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर
जामनेर प्रतिनिधी
भारतीय जैन संघटनेच्या(बीजेएस)40 वर्षाच्या इतिहासात प्रथमतः ग्राउंड लेव्हलच्या कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्ता सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या प्रेरणेने व मॅनेजिंग डायरेक्टर कोमल जैन यांच्या मार्गदर्शनाने दिनांक 7 मे 2026 रोजी संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान आधी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून 288 पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात नमस्कार महामंत्राने करून सुरुवातीला संघटनेच्या सामुदायिक विवाह कार्यक्रम ज्यात शांतीलाल मुथा यांच्या मुलांचा विवाह केला होता. त्यानंतर परिचय संमेलन, 1993 मधील लातूर भूकंप,जम्मू कश्मीर अंदमान निकोबार, नेपाळ , मेळघाट येथील कामे, 2018 मध्ये पाण्याच्या संदर्भात बुलढाणा
येथे पायलट प्रोजेक्ट,2024 मध्ये भारतातील 100 शहरे जल पर्याप्त म्हणून पर्यंत घेतले, 2019 पासून मूल्यवर्धन शिक्षण, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार आदी कामांची माहिती कोमल जैन यांनी दिली.
यानंतर संघटना परिवार व नातेसंबंध, मूल्य आणि आचरण,प्राकृतिक संसाधनाचे रक्षण, शिक्षण विकास, नैसर्गिक आपत्ती, आरोग्य संपदा व भ्रमण या 7 बाबींवर काम करीत असल्याचे सांगितले.
संघटनेच्या बास्केटमध्ये वर्षभरातील 14फाउंडेशन कार्यक्रम याशिवाय स्मार्ट गर्ल,एमएसएमई,परिणय पथ,कपल एम्पॉवरमेंट आदी व नव्याने येत असलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच शाखा म्हणजे काय,स्थापना कशी करावी, कार्यकारणी किती सदस्यांची असावी, आर्थिक नियोजन कसे करावे याबाबत ऊहापोह केला गेला. देशात बारा राज्यात संघटनेची कार्य असून एकूण 700 शाखा व 50 हजार कार्यकर्ते आहेत.
राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी पंकज चोपडा दिनेश पालरेचा, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष केतन शहा, राज्य महासचिव प्रवीण पारख,राज्य उपाध्यक्ष विनय पारख, राज्य सचिव, राज्य कार्यकारणी
खान्देश विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा ,अशोक राखेचा,विभाग उप अध्यक्ष सुमित मुनोत, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष अल्पेश जैन,जलगांव जिल्हा सचिव दर्शन जैन,जामनेर महिला अध्यक्ष मोना चोरड़िया आणि मुख्य कार्यालयाकडून अमित ढाणे,अभिजीत पेटकर, विविध शाखांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.असे प्रशिक्षण नियमितपणे सुरू राहणार असल्याचे कोमल जैन यांनी सांगितले.
