अंशतः अनुदानित शिक्षकांना मोठा दिलासा! मुख्यमंत्री फडणवीस यांचा शब्द – ‘शिक्षकांना न्याय मिळणार’आ. किशोर दराडे सत्यजित तांबे यांच्या पुढाकाराने शिक्षक आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक; अधिवेशनात तोडग्याची हमी

नाशिक (प्रतिनिधी) – राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांच्या लढ्याला मोठे यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक विभागाचे शिक्षक आमदार आ. किशोर दराडे सत्यजित तांबे यांच्या आग्रही पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिक्षक आमदारांची निर्णायक बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ठाम शब्द देत, “शिक्षकांवर अन्याय होणार नाही. शासनाकडून विलंब झाला असला, तरी यंदाच्या अधिवेशनात शिक्षकांना निश्चित दिलासा मिळेल,” अशी ग्वाही दिली.आ. किशोर दराडे यांचा आक्रमक पाठपुरावाशिक्षकांच्या मागण्यांसाठी आ. किशोर दराडे यांनी नाशिकमध्ये शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी थेट राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला. आ. सत्यजित तांबे, विक्रम काळे आ. किरण सरनाईक आणि आ. जयंत तासगावकर यांच्यासह त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आणि शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना गती देण्याची मागणी केली.मुख्यमंत्र्यांचे आश्वासनमुख्यमंत्र्यांनी 14 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर झालेल्या 20% वाढीव वेतन अनुदानाच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी रखडल्याची बाब मान्य केली. “लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल,” असे सांगत त्यांनी शिक्षकांना दिलासा दिला. आगामी अधिवेशनात आर्थिक आणि प्रशासकीय अडथळे दूर करून शिक्षकांच्या मागण्यांवर ठोस तोडगा काढण्याचे प्राधान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.शिक्षकांमध्ये नव्या आशेचा संचारमुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे आंदोलनात सहभागी शिक्षकांमध्ये उत्साह आणि नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे. नाशिकसह राज्यभरातील शिक्षक संघटना एकजुटीने लढत असून, आ. किशोर दराडे यांच्या राजकीय पाठबळामुळे आंदोलनाला बळ मिळाले आहे. अधिवेशनात शिक्षकांना न्याय मिळण्याची अपेक्षा आता वाढली आहे.‘शिक्षकांचा लढा यशस्वी होणार!’या सकारात्मक घडामोडींमुळे शिक्षकांचा आवाज आता शासनापर्यंत पोहोचला असून, अधिवेशनातील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.यासाठी महासंघाचे अध्यक्ष डॉ संजय शिंदे , ‘शिक्षक सेना प्रा. संजय चव्हाण ,शिक्षक समन्वय संघाच्या वतीने अनिल परदेशी, सुभाष पवार, कर्तरसिंग ठाकूर, रवी पवार ,प्रकाश तायडे, तसेच जुक्टो संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील गरुड ,शैलेश राणे ,नंदन वळींकार, सुनील सोनार यासह मोहन चकोर आधी पदाधिकारी यांनी आमदार किशोर दराडे, सत्यजित तांबे, विक्रम काळे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

Read More

लुबाडलेले 1600 रुपये काही मिनिटांतच सैनिकाच्या खात्यात परत

पाचोरा – निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारिता हे लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून ओळखले जाते, याचे जिवंत उदाहरण नुकतेच पाचोरा येथे पाहायला मिळाले पत्रकार संदीप महाजन यांनी अनधिकृत रेल्वे तिकीट एजंटकडून भारतीय सैनिकाची करण्यात आलेली आर्थिक लुबाडणूक उघडकीस आणताच संबंधित भामट्याने युद्धजन्य परिस्थिती काळात अफरातफरीत केलेली फसवणूक लपवण्यासाठी केवळ काही मिनिटांतच सैनिकाच्या खात्यात 1600 रुपये परत वर्ग केले.ही घटना आहे पिंपरी सार्वे येथील रहिवासी आणि सध्या CISF मध्ये कार्यरत असलेल्या जवान प्रदीप बाविस्कर यांच्या बाबतीत. देशात युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळे जवानांना तातडीने त्यांच्या सेवास्थळी परत हजर राहण्याचे आदेश मिळाले होते. या घाईत त्यांनी रेल्वे तिकीट काढण्यासाठी पाचोरा येथील तिकीट एजंटची मदत घेतली. मात्र त्या एजंटने एका सामान्य तिकिटासाठी वाजवी रक्कमेपेक्षा तब्बल 1600 रुपये जास्त रक्कम आकारून लुबाडणूक केली.या प्रकाराची माहिती पत्रकार संदीप महाजन यांना मिळताच त्यांनी या विषयावर सखोल चौकशी केली आणि समाजमाध्यमांद्वारे, तसेच ‘ध्येय न्यूज’च्या माध्यमातून ही धक्कादायक बातमी सर्वांसमोर आणली. पत्रकारितेतील जबाबदारी आणि लोकहितासाठी त्यांनी दाखवलेली तत्परता पाहून ही बातमी काही वेळातच व्हायरल झाली. बातमीचा समाजावर, प्रशासनावर आणि संबंधित एजंटवर इतका परिणाम झाला की, संबंधित एजंटने काही मिनिटांत जवानाच्या खात्यावर 1600 रुपयांची रक्कम परत पाठवली.ही घटना ही केवळ पत्रकाराच्या सचोटीची विजयगाथा नाही, तर हे एक जिवंत उदाहरण आहे की सत्याचे धारदार लेखणीसमोर अन्याय करणाऱ्यांची लाचारी उघड होते. पत्रकार महाजन यांनी या प्रकरणात कोणत्याही आमिषाला बळी न पडता, केवळ सैनिकाचा हक्क परत मिळावा या हेतूने ही बातमी उघडकीस आणली.या प्रकरणानंतर शहरातील जनमानसात पत्रकार महाजन यांच्या कार्याची भरभरून स्तुती होत असून अनेकांनी सोशल मीडियावर “हीच खरी पत्रकारिता” असे म्हटले आहे. शिवाय, यामुळे भविष्यात या आणि अशाप्रकारे लूट करणाऱ्या अनधिकृत रेल्वे एजंटांचा धसका बसेल व सामान्य नागरिकांची लुबाडणूक टळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.प्रशासनाने सुद्धा या भामट्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. पत्रकारिता म्हणजे केवळ माहिती पोहोचवणे नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्याचे हत्यार आहे, याचे हे अत्यंत प्रभावी उदाहरण आहे.

Read More

जळगाव जिल्ह्याचा विकास वेगवान – 756 कोटींपैकी 91.60% निधी वितरित

जळगाव, 22 मार्च: जळगाव जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा वार्षिक नियोजन 2024-25 अंतर्गत मंजूर झालेल्या 756 कोटी रुपयांपैकी तब्बल 91.60% निधी वितरित करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. पालकमंत्र्यांनी 31 मार्च 2025 पूर्वी सर्व प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच, जळगाव जिल्ह्याचा विकास राज्यात आघाडीवर राहण्यासाठी सर्व यंत्रणांनी अधिक गतीने आणि समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले. बैठकीतील महत्त्वाचे निर्णय आणि चर्चा: १. आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा: ✅ जिल्हा नियोजन निधीतून 8 नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे लवकरच लोकार्पण✅ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या बळकटीकरणासाठी विशेष निधी – गोरगरीब रुग्णांना मोफत उपचारांचा मोठा दिलासा✅ पशुसंवर्धन विभागासाठी अतिरिक्त निधी – जिल्ह्यातील पशुधनासाठी दर्जेदार उपचार उपलब्ध २. पर्यटन आणि पर्यावरण संरक्षण: ✅ वन विभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर – विकासकामांना वेग देण्याचे आदेश✅ वन सफारी सुरू करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश✅ पारोळा किल्ल्याचे सुशोभिकरण आणि अतिक्रमण हटवण्यासाठी ठोस निर्णय ३. महिला सशक्तीकरण आणि सामाजिक प्रकल्प: ✅ महिला भवन व वन स्टॉप सेंटरची उभारणी पूर्ण✅ क्रीडा विभागाने व्यायामशाळा प्रकल्पाला गती द्यावी ४. शहरी आणि ग्रामीण पायाभूत सुविधा: ✅ सार्वजनिक बांधकाम विभागाने अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत✅ महानगरपालिकेच्या प्रलंबित प्रकल्पांसाठी आयुक्तांनी विशेष लक्ष द्यावे✅ ग्रामीण भागात रस्ते आणि सिंचन प्रकल्पांना प्राधान्य बैठकीस उपस्थित प्रमुख अधिकारी: ✔ जिल्हाधिकारी: आयुष प्रसाद✔ जिल्हा पोलीस अधीक्षक: डॉ. महेश्वर रेड्डी✔ जिल्हा परिषदेच्या CEO: मीनल करनवाल✔ महानगरपालिका आयुक्त: ज्ञानेश्वर ढेरे✔ जिल्हा नियोजन अधिकारी: विजय शिंदे✔ समाजकल्याण विभाग सहायक आयुक्त: योगेश पाटील✔ आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी: अरुण पवार निष्कर्ष: ✔ 31 मार्च 2025 पूर्वी सर्व विकासकामे पूर्ण करण्याचा निर्धार✔ विभागीय समन्वय वाढवून जिल्ह्याचा विकास वेगाने पुढे नेण्याचे निर्देश✔ जळगाव जिल्हा राज्यातील आघाडीच्या विकास जिल्ह्यांपैकी एक राहणार!

Read More

गोपद्म फेड शेतकरी उत्पादक कंपनी यांनी भारतीय औद्योगिक महासंघाचा ‘सीआयआय सर्वोत्कृष्ट एफपीओ’ पुरस्कार जिंकला

भारत सरकार महत्त्वकांक्षी प्रकल्प अंतर्गत ‘नाफेड’व ‘कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था’ यांच्या मार्गदर्शनाने स्थापन झालेल्या गोपद्म फेड शेतकरी उत्पादक कंपनी यांनी भारतीय औद्योगिक महासंघाचा ‘सीआयआय सर्वोत्कृष्ट एफपीओ’ पुरस्कार जिंकला आहे. महाराष्ट्रातील जामनेर येथील ‘गोपद्म एफपीसी’ला मूल्यवर्धन आणि ब्रॅण्डिंग श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले. देशभरातून विविध पुरस्कार श्रेणींसाठी 140 अर्ज आले होते त्यापैकी 12 एफपीओंची निवड करण्यात आली त्यात जामनेरच्या ‘गोपद्म एफपीसी’चा समावेश आहे. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणात आणि ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या शेतकरी उत्पादक संस्थांचा “सीआयआय” तर्फे सन्मान केला जातो. शेतकरी आणि शेतकरी समुदाय विशेषता: अल्पभूधारकांना अधिक सक्षम बनवण्यासाठी ‘कृषीविकास’ ही संस्था शेतकरी उत्पादक संस्थांना मार्गदर्शन करते, त्यामध्ये गोपद्म शेतकरी उत्पादक कंपनी अग्रेसर आहे. जामनेर येथील शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत शेतकऱ्यांना विविध ब्रँड अंतर्गत विषमुक्त, भेसळमुक्त व आरोग्यदायी शेतमालास ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली असून गोशाळेच्या माध्यमातून कमी खर्चातील विषमुक्त शेतीचे प्रशिक्षण देणारे अनेक शेतकरी प्रतिनिधी कंपनी सोबत जुळलेले आहेत तसेच ऑनलाईन सर्व शासकीय योजना व कृषी सेवा, बँक कर्ज प्रक्रिया, कृषी विस्तार व मार्गदर्शन, प्रकल्प अहवाल व प्रस्ताव, शासकीय अनुदानासह यातील सर्व घटकांचे मार्गदर्शन व सुविधा या एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच ‘गोपद्म एफपीसी’ ने गोपालनातून आर्थिक समृद्धतेसाठी शेण, गोमूत्राचे मूल्यवर्धन करून विविध आरोग्यदायी औषधी, अर्क उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, शेती उपयुक्त विषमुक्त खते, औषधे, घरगुती व आध्यात्मिक वापराच्या वस्तू निर्मितीतून नाविन्यपूर्ण ब्रँडसह रोजगारात चालना व महिलांना रोजगार संधी निर्माण केली आहे.दि. १० डिसेंबर रोजी “इंडिया हॅबिटॅट सेंटर”,नवी दिल्ली येथे भारतीय उद्योग महासंघ व कृषी मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार सोहळ्यामध्ये श्री मिन्हांज आलम, (आय.ए.एस) अतिरिक्त सचिव, अन्न व उद्योग मंत्रालय, भारत सरकार, श्री.शिवकुमार, अध्यक्ष, भारतीय उद्योग महासंघ व राष्ट्रीय कृषी परिषद नवी दिल्ली, प्रा.ग्लेन डेनिंग,कोलंबिया विद्यापीठाचे संस्थापक संचालक व सौ. सीमा अरोरा, उपमहासंचालक, भारतीय उद्योग महासंघ, श्री संजय सचेती, संचालक, भारतीय उद्योग महासंघ इ. मान्यवरांच्या हस्ते “गोपद्म एफपीसी”चा गौरव करण्यात आला. कंपनीच्या वतीने चेअरमन श्री.प्रदीप महाजन व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रोहन लोखंडे यांनी पुरस्कार स्वीकारला.

Read More
error: Don't Try To Copy !!