मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत भव्य रोगनिदान व शस्त्रक्रिया शिबिर

जामनेर :(प्रतिनिधी) जामनेर तालुक्याचे भाग्यविधाता म्हणून ओळखले जाणारे मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त कमल फाउंडेशन, जामनेर यांच्या वतीने भव्य मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार दि. 17 मे 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत एकलव्य माध्यमिक विद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज नगर, जळगाव रोड, जामनेर येथे पार पडणार आहे.या शिबिरात विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कॅन्सर, हृदयरोग, हाडांचे विकार, मूत्ररोग, न्यूरोसर्जरी, जनरल सर्जरी, बालरोग, स्त्रीरोग, नेत्र तपासणी आदी विभागातील नामांकित तज्ज्ञ डॉक्टर नागरिकांची तपासणी करणार आहेत.शिबिरात डॉ. निलेश चांडक, डॉ. प्रितेश कोठारी, डॉ. मनोज पाटील, डॉ. मनोज टोके, डॉ. टी. पी. महाजन, डॉ. सचिन साठे, डॉ. भूषण पाटील, डॉ. निखिल पाटील, डॉ. रविंद्र सुखक्कर, डॉ. अभिनव नाईक, डॉ. मृण्णा सोमाणी, डॉ. सौरभ पाटील, डॉ. सतीष चौधरी, डॉ. नेहा काबरा, डॉ. गिरधारी जेधे तसेच डॉ. पांडुरंग अल्टाट यांसारखे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.शिबिरासाठी येताना नागरिकांनी आपले जुने वैद्यकीय रिपोर्ट सोबत आणावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.या उपक्रमास कमल हॉस्पिटल व मॅटर्निटी होम, जामनेर यांचे सहकार्य लाभले असून भारतीय जनता पार्टी, जामनेर यांचे विशेष सहकार्य आहे. आयोजनाची जबाबदारी कमल फाउंडेशन, जामनेर यांनी स्वीकारली आहे.

Read More

निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार एस.एस.सी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

पळसखेडे मिराचे, प्रतिनिधी : धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी, शेंदुर्णी संचलित निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय, पळसखेडे मिराचे येथे फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेत सेमी व मराठी माध्यमातून प्रथम पाच क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज दि. 9 मे रोजी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री व्ही. आर. पाटील सर प्रमुख उपस्थित होते. तसेच इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक श्री व्ही. डी. पाटील सर, श्री जी. पी. पाटील सर, श्री पी. के. राजपूत सर, श्री व्ही. ए. पाटील सर, सीनियर क्लार्क श्री के. आर. सोनवणे भाऊसाहेब तसेच ग्रंथपाल श्री डी. एस. बोरसे सर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. यावेळी विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी मुख्याध्यापक आदरणीय नानासाहेब यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत यशाची परंपरा कायम राखण्यासाठी मेहनत, सातत्य व शिस्त यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते.

Read More

अटलांटा प्रकरण मुख्यमंत्र्यांचे फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

जळगाव (नितीन सोनवणे) : मुंबईतील वर्षा बंगला येथे आज सायंकाळी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत जळगाव महानगरपालिकेशी संबंधित अटलांटा कन्स्ट्रक्शन प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले.जळगाव शहर पोलीस ठाण्यात अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध नगरसेवक अरविंद देशमुख यांनी यापूर्वीच फौजदारी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत महापालिकेची आर्थिक फसवणूक, विश्वासघात आणि कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.आज या पार्श्वभूमीवर नामदार गिरीश महाजन आमदार राजू मामा भोळे, नंदू आडवाणी, मनोज काळे आणि तक्रारदार नगरसेवक अरविंद देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत अरविंद देशमुख यांनी स्वतः दाखल केलेल्या तक्रारीचा सविस्तर संदर्भ मांडत प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट केली.मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण बाब गांभीर्याने ऐकून घेतल्यानंतर तात्काळ दखल घेत जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढोरे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधत सरकारी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले, अशी माहिती समोर आली आहे.या आदेशामुळे अटलांटा प्रकरणातील तपास प्रक्रियेला अधिकृत गती मिळणार असून, महापालिका प्रशासनाकडून थेट कारवाई होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, आधीच नगरसेवक अरविंद देशमुख यांनी दाखल केलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित झाली होती; आता त्याच संदर्भावर शासनस्तरावरून ठोस पाऊल उचलले गेल्याने दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.जळगाव शहरात या घडामोडीमुळे मोठी राजकीय व प्रशासकीय हालचाल निर्माण झाली असून, संपूर्ण प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read More

सकल मराठा समाज बैठक जामनेर येथे उत्साहात पार पडली

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर प्रतिनिधीजामनेर येथे सकल मराठा समाजाची महत्वाची बैठक उत्साहात व संघटनात्मक वातावरणात पार पडली. आगामी राज्यव्यापी कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर समाजबांधवांना संघटित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.राजमाता जिजाऊ यांच्या माहेरचे वंशज शिवाजी राजे जाधव यांचे मार्गदर्शनशिवाजी राजे जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनात राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज अधोरेखित केली.राजमाता जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा ते स्मृतीस्थळ पाचाड (रायगड) या जिजाऊ अभिवादन यात्रेत जामनेर तालुक्यातून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले. ही यात्रा केवळ श्रद्धेची नसून मराठा समाजाच्या एकतेचे व विचारप्रसाराचे प्रभावी माध्यम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. अशोक शिंदे यांचे विचारअशोक शिंदे यांनी आपल्या भाषणात मराठा समाजाने आपल्या गौरवशाली इतिहासाची जाणीव कायम ठेवावी, असे आवाहन केले.राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांवर आधारित संघटनात्मक कार्य उभारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.छत्रपती शिवाजी ब्रिगेड अन्यायाविरुद्ध ठामपणे आवाज उठवत असून समाजाच्या प्रत्येक प्रश्नात सक्रियपणे हस्तक्षेप करत आहे. समाजातील एकोपा वाढवून न्यायासाठी लढण्याची भूमिका अधिक मजबूत करण्याचे त्यांनी आवाहन केले. अध्यक्षीय भाषण – प्रकाश पाटीलकार्यक्रमाचे अध्यक्ष भाग्योदय कलेक्शनचे श्री. प्रकाश पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठा समाजातील तरुणांना उद्योग-व्यवसाय क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन केले.छोटा असो वा मोठा व्यवसाय, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक तरुण उद्योजकाच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज ठामपणे उभा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक – राहुल चव्हाणकार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल चव्हाण यांनी केले.त्यांनी सांगितले की, १४ जून ते १७ जून दरम्यान होणाऱ्या जिजाऊ अभिवादन यात्रेसाठी ग्रामपातळीवर बैठका आयोजित करून मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. मागील तीन वर्षांपासून आपण यात्रेत सहभागी होत आहोत, मात्र यंदा विक्रमी सहभाग नोंदवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. इतर मान्यवरांची उपस्थितीया बैठकीस अशोक आप्पा जाधव, समाधान वाघ, सुपडू पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.बैठकीत दिलीप खोडपे सर, व्ही.पी. पाटील सर, पप्पू पाटील, कैलास पाटील, ईश्वर पवार, अशोक पाटील, दिलीप पाटील, ईश्वर चवरे, रवि बंडे, सागर पाटील, दिपक पाटील, राहुलरॉय मुळे, सागर मराठे यांच्यासह असंख्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनकार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल ठोंबरे यांनी केले.या बैठकीतून मराठा समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी ठोस दिशा देण्यात आली असून, आगामी जिजाऊ अभिवादन यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात जनसहभाग घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Read More

जामनेर -भारतीय जैन संघटनेची व्यापारी सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर प्रतिनिधीजामनेर येथील व्यपाऱ्यांना उद्योग-व्यवसायात अधिक सक्षम बनविण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या व व्यापारी एसोसिएशन यांच्या वतीने विशेष कार्यशाळेचे येथील महावीर भवन मध्ये आयोजन करण्यात आले.खानदेशात तळोदा,शहादा,शिरपूर, धुळे,शिंदखेडा, पाचोरा , जळगांव या सात ठिकाणी कार्यशाळा होऊन जामनेर येथील ही 8 वी कार्यशाळा असून, राज्य अध्यक्ष केतन शहा, राज्य महासचिव प्रवीण पारख यांच्या मार्गदर्शनाने व उपाध्यक्ष विनय पारख, खानदेश विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा यांच्या प्रयत्नाने केले गेले असल्याचे विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत यांनी सांगितले.कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक म्हणून सुनील भवरीलालजी गादीया यानी सहकार्य केले.या कार्यशाळेत उद्योजकतेसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सखोल माहिती देण्यात आली.कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून निरंजन जैन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी उद्योग-व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांची माहिती, त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया, तसेच कर्जासाठी लागणारी सिक्युरिटी (हमी) याबाबत सविस्तर विवेचन केले. योजनांमध्ये आवश्यकता नसते, तर काही योजना मर्यादित सिक्युरिटी घेतली जाते, माहिती त्यांनी दिली. या सेमिनारला ओसवाल जैन संघचे सचिव ईश्वरलालजी साबद्रा,पारसनाथ देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष प्रकाश सैतवाल,व्यापारी एसोसिएशन व किराना अध्यक्ष ताराचंद झांवर, उपाध्यक्ष पुखराज डांगी, एमआयडीसी अध्यक्ष सुभाष बोहरा, अड़त अध्यक्ष प्रकाश कोठारी,कृषि अध्यक्ष प्रदीप लोढ़ा, डॉक्टर्स अध्यक्ष डॉ कांतिलाल ओस्तवाल,मेडिकल अध्यक्ष पंढरी पाटिल,कपड़े व्यापारी अध्यक्ष संजय चिंचकर,सीए उपाध्यक्ष अनिल मुनोत कार्यशाळेला उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज़िला उपाध्यक्ष विकास कोठारी, जामनेर शहर अध्यक्ष कुशल बोहरा, उपाध्यक्ष अभिनंदन जैन,सदस्य विकास ललवानी,मयूर पोरवाल,संजय ललवानी,कुणाल चंडालिया,महिला सदस्य मनीषा कोठारी,वंदना चोरड़िया , भाग्यश्री लुंकड आदि सदस्यंनी प्रयत्न केले.कार्यशाळेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांना शासकीय योजनांविषयी स्पष्ट व उपयुक्त माहिती मिळाली असून,भविष्यात उद्योग वृद्धीसाठी या मार्गदर्शनाचा मोठा फायदा होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.सूत्र संचालन वंदना चोरड़िया आणि आभार प्रदर्शन डॉ कांतिलाल ओस्तवाल यानी केले.

Read More

सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीतील विद्यार्थिनीवर अत्याचार; संतप्त ग्रामस्थांनी मास्तरला दिला चोप

सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीतील विद्यार्थिनीवर अत्याचार; संतप्त ग्रामस्थांनी मास्तरला दिला चोप 🌷जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर 🌷 दिनांक ,:6/04/2026 रोजि बुलढाणा जिल्ह्यातील लोणी गवळी गावातील एका प्राथमिक शाळेत असा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला. आहे एका 58 वर्षीय नराधमाने तिसरी मध्ये शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर, गावकऱ्यांनी संबंधित शिक्षकाला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील लोणी गवळी गावातील प्राथमिक शाळेत तिसरीत शिकणाऱ्या एका नऊ वर्षीय विद्यार्थिनीसोबत 58 वर्षीय शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला. सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. घटना गावातील नागरिकांना माहीत पडताच शेकडोंचा जमाव शाळेवर चालून गेला. गावातील नागरिक आणि महिलांनी या शिक्षकाला चांगलाच चोप देत . तात्काळ या घटनेची माहिती डोनगाव पोलिसांना देण्यात आली त्यानंतर नराधम आरोपी शिक्षक महादेव आत्माराम मानतोडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, गावकरी पोलिसांना या शिक्षकाला घेऊन जाण्यास नकार करत होते व गेल्या तीन तासांपासून शाळेत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, शेवटी पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढत या आरोपी शिक्षकाला डोनगाव पोलीस स्थानकात आणले आहे, सध्या गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे हा नराधम शिक्षक येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहे. सेवानिवृत्तीला अवघा दीड महिना बाकी असताना आणि वयोवृद्ध असतानाही नराधम शिक्षकाने शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासण्याचं काम केलंय. सध्या जानेफळ पोलीस स्थानकाच्या बाहेर मोठी गर्दी असून शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Read More

अखील भारतीय विद्यापीठ कुस्ती वतायकांदो स्पर्धात हरियाणा व ओडिसा राज्यात होणाऱ्या स्पर्धेसाठी गरुड महाविद्यालयातील खेळाडूंची निवड

अ. र.भा गरुड कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी येथील कु. गौरी कुमावत (SYBSC ) कू हर्षदा चौधरी TYBsc व कु.लोचाना चौधरी SYBsc यांची निवड कुरुक्षेत्र हरियाणा येथे होणाऱ्या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली व कु. गौरी कुमावत हिची निवड तयकांदो स्पर्धेसाठी बालासोर ओडिसा राज्यात होणाऱ्या अखिल भारतीय स्पर्धेसाठी निवड झालीयशस्वी विद्यार्थिनीचे अभिनंदन शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. दादासाहेब संजयराव भास्करराव गरुड, व्हा. चेअरमन मा. आबासाहेब भीमराव शामराव शेळके तसेच संस्थेचे सचिव मा. काकासाहेब सागरमलजी जैन, सहसचिव दादासाहेब यू.यू पाटील सर, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दीपकजी गरुड , सर्व संचालक मंडळ व सर्व संस्था परिवार , महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रा. डॉ.संजय भोळे , उपप्राचार्य डॉ. श्याम साळुंखे डॉ.अमर जावळे प्रा.आप्पा महाजन सर क्रीडा संचालक प्रा.डॉ.महेश पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले

Read More

टाकळी (ता. जामनेर) येथे धनाई बालक मंदिरच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

टाकळी (ता. जामनेर) येथे धनाई बालक मंदिरचे संचालक श्रीकांत अहिरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तसेच इयत्ता आठवीतील एन.एम.एम.एस. परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. एन.एम.एम.एस. परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी दर्शन समाधान मोरे, हर्षल गणेश जाधव, तेजस राहुल दुसाने व रितेश मुरलीधर सपकाळ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत कठोर परिश्रम व सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मुला-मुलींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. या कार्यक्रमासाठी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र काका पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, महेंद्र भाऊ बाविस्कर (नगरसेवक, जामनेर), कमलाकर भाऊ पाटील (मा. सभापती), नवल भाऊ पाटील राजपूत (माजी सभापती), सदाशिव चौरे सर, इंदिराबाई ललवाणी (उपमुख्याध्यापक, जामनेर), सुपडू सोनार (सेवानिवृत्त शिक्षक, टाकळी), डॉ. राहुल माळी (शांताई हॉस्पिटल, जामनेर), अरुण सातव सर (सातव क्लासेस, जामनेर), प्रा.ईश्वर चोरडिया, प्रा. सागर बाविस्कर,आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रामकृष्ण सर गायकवाड (सेवानिवृत्त शिक्षक) यांनी भूषविले. तसेच बाळूभाऊ चौरे (ग्रामपंचायत सदस्य), सारंगधर अहिरे (माजी सरपंच), समाधान वराडे, दीपक बाविस्कर, रमेश वराडे, पवन महाजन, उमेश बंडे तसेच गावातील इतर प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धनाई क्लासेसचे संचालक श्रीकांत अहिरे सर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

Read More

मानसिंग आप्पांचा ८१ वर्षांचा सुवर्णप्रवास — सहस्रचंद्र दर्शनाचा अनोखा गौरव सोहळा संपन्न..!

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरबोदवड प्रतिनिधीआज आत्मसन्मान फाउंडेशन, बोदवड येथे आपल्या सर्वांचे आदरणीय माझ्या परिवाराचे कायम ऋणानुबंध असलेले गो.बा.ढाके महाविद्याल ऐणगावचे सेवानिवृत्त प्रयोगशाळा सहाय्यक उत्सवमूर्ती मा. मानसिंग आप्पा पाटील यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. हा कार्यक्रम आप्पांच्या परिवाराने घडवून आणला.या प्रसंगी मंचावर ॲड. जगनदादा लोखंडे, पुरुषोत्तम गड्डम सर, गोपालजी अग्रवाल, डॉ. विजय पाटील, डॉ. सुधीर पाटील, भरत आप्पा पाटील, पवन राजे पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री. रोहन लोखंडे यांनी केले. प्रस्ताविक भरतसिंह राजपूत यांनी मांडले तर आभार प्रदर्शन अतुल पाटील व विशाल पाटील यांनी केले.व्यासपीठावरील मान्यवरांनी मा. मानसिंग आप्पा पाटील यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर प्रकाश टाकत त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. 🌿 पर्यावरण प्रेमी संजय वराडे यांच्या हस्ते फणस वृक्षाची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश देण्यात आला.आप्पांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आत्मसन्मान फाउंडेशन येथील मनोयात्रींना स्नेहभोजन देण्यात आले. या आनंददायी सोहळ्याला आप्पांचा संपूर्ण परिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री महेंद्रसिंग सर व संपूर्ण परिवार यांनी परिश्रम घेतले.हा सोहळा म्हणजे केवळ वाढदिवस नव्हे, तर एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा सन्मान आणि जीवनमूल्यांचा उत्सव होता.

Read More

वाकडी येथे महिला मुतारीचे बांधकाम बोगस

वाकडी.ता.जामनेर.दि.२२/०२/०२६ वाकडी येथे बसस्थानक परिसरात मध्ये सहा महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिला मुतारी बांधकाम करण्यात आले होते, मात्र निकृष्ट दर्जाचे झाल्याने आज रोजी महिला मुतारीची दुरवस्था झाली आहे,मुतारी च्या आजूबाजूला अवैध धंदे गावठी,देशी,इंग्लिश,दारू विक्री होताना मोठ्या प्रमाणात होत आहे त्याचा त्रास महिला वर्ग व विध्यार्थी याना होत आहे महिला व शाळेकरी विद्यार्थ्यांनी लघुशंकेसाठी कोठे जावे हा प्रश्न निर्माण झाला आहे, महिला मुतारीचे बांधकाम करुन सहा महिने सुध्दा झाले नसले तरी , मुतारी ही नदी किनारी असल्याने मुतारी मध्ये मोठे पोकळ ढिगाळ पडले आहे,खालून मोठे बोगदे पडल्याने उतार निर्माण होवून एखादी महिला किंवा विद्यार्थ्यांनी लघुशंकेसाठी जर मुतारी मध्ये गेली तर पाय घसरून पडण्याचा संभव आहे,मुतारी मध्ये भराव न टाकता बोगस काम करून मोकळे झाले आहे त्यामुळे बसस्थानक परिसरात दुसऱ्या लघुशंकेसाठी जागा नाही,यामुळे महिलांमध्ये भिंतीचे वातावरण आहे,या बसस्थानक परिसरात परिसरातील कर्णफाटा, राहेरा, कासली,गोराडखेडा,शेंगोळा,चिंचखेडा,हिवरखेडा,लोणी जाणाऱ्या महिला वर्ग व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थांबतात त्यांना हि त्रास सहन करावा लागत असल्याने स्थानिक ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी याकडे लक्ष्य देवून दुरवस्था झालेल्या मुतारीचे बांधकाम पुन्हा करावे अशी मागणी महिला करतांना दिसत आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!