मैत्रेंय प्रकरण:- कोर्टात महत्त्वाची सुनावणी, मालमत्ता विक्रीसाठी आदेश.

मुंबई: 17 फेब्रुवारी 2025 – मुंबई सत्र न्यायालयात आज वर्षा मधुसुदन सत्पाळकर आणि अन्य आरोपींविरुद्ध महत्त्वाची सुनावणी पार पडली. विशेष सत्र न्यायालय क्रमांक 20 मधील न्यायमूर्ती एन. जी. शुक्ला यांच्या समोर ही सुनावणी झाली. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा (EOW) आणि विविध गुंतवणूकदारांचे लक्ष लागून आहे.राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील (SPP) प्रदीप घरत यांनी बाजू मांडली, तर एपीआय (EOW) श्री. सालुंके आणि पीसी श्री. डी. सुर्यभान हे देखील उपस्थित होते. गुंतवणूकदारांचे प्रतिनिधित्व करणारे अधिवक्ता एस. बी. भटगुनाकी आणि त्यांच्या संघाने युक्तिवाद केला. मात्र, आरोपी जामिनावर असूनही कोर्टात अनुपस्थित होते, याची नोंद घेण्यात आली. यावेळी, सीए श्री. रविंद्र शिंगाडे यांनी मालमत्ता विक्रीसंदर्भातील अहवाल सादर केला, ज्याला “टॉर एक्झ.16” म्हणून चिन्हांकित करण्यात आले. या अहवालानुसार, राज्य सरकारने क्विकर रिअॅलिटी प्रा. लिमिटेड या वित्तीय आस्थापनेची नेमणूक केली आहे. मैत्रेया ग्रुप ऑफ कंपन्या या गटाच्या संलग्न मालमत्तांची लिलाव विक्री करण्यासाठी ही नेमणूक करण्यात आली आहे.कोर्टाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 मार्च 2025 रोजी ठेवली असून, त्यापर्यंत लिलाव प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांबाबत सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.आर्थिक गैरव्यवहार, गुंतवणूकदारांची फसवणूक आणि मालमत्ता जप्ती यामुळे गाजत असलेल्या या प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष आहे. पुढील सुनावणीत लिलाव प्रक्रियेचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

Read More

लोहारा येथे मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न.विजेते र्धकांना रोख बक्षिसे, ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

लोहारा ता.पाचोरामहात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्ताने समता,बंधुता,सदाचार व शांतीचा संदेश देण्यासाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन दादाश्री विश्व लॉन्स डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय पाचोरा रोड लोहारा येथे आयोजित करण्यात आले होते. रेबीन कापून स्पर्धेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. खुला गट वय १६ ते ४०रन अप ६ किलोमीटर, प्रथम बक्षीस दीपक भोई शेंदुर्णी, द्वितीय क्रमांक बक्षीस गोपाल कोळी ,तृतीय क्रमांक सौरव राजपूत, तीन किलोमीटर खुल्या गटात प्रथम बक्षीस सुरज माळी शाहपुरा द्वितीय बक्षीस हर्षल भोई शेंदुर्णी तृतीय बक्षीस कराड नवघरे शेंदुर्णी 200 मीटर स्पर्धेत शालेय मुलांच्या गटात प्रथम बक्षीस प्रथमेश धोबी लोहारा, द्वितीय बक्षीस प्रितेश कुंभार लोहारा तृतीय बक्षीस भूषण मीना कासमपुरा 200 मीटर मुलींच्या गटात प्रथम बक्षीस निहार राजपूत कासमपुरा,द्वितीय बक्षीस मोनाली कोळी लोहारा ,तृतीय बक्षीस डिंपल थोरात कासमपुरा. 100 मीटर शालेय मुलींच्या गटात प्रथम बक्षीस दुर्गेश्वरी परदेशी कासमपुरा,द्वितीय बक्षीस खुशी गोंधळे लोहारा ,तृतीय बक्षीस विशाखा खाटीक लोहारा. 100 मीटर शालेय गट मुलांचा प्रथम बक्षीस आसिफ पिंजारी लोहारा,द्वितीय बक्षिस मोहन कोळी लोहारा, तृतीय बक्षीस सार्थक चौधरी लोहारा, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी यशोदाबेन मोदी कृषीभूषण कृषीरत्न विश्वासराव पाटील, ,डॉ सागर गरुड,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, सरपंच अक्षय जैस्वाल, डॉ प्रितेश चौधरी,विकासो चेअरमन प्रभाकर चौधरी, माजी सरपंच अमृत चौधरी, माजी मुख्याध्यापक अ अ पटेल, ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण माळी, भोसंडे गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर देशमुख, सुरेश चौधरी, पत्रकार दीपक पवार, रमेश शेळके, चंद्रकांत पाटील, दिलीप चौधरी, ज्ञानेश्वर राजपूत, गजानन क्षीरसागर, अनिल तडवी, उपस्थित होते. स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून तडवी सर,धोनी सर,गायकवाड सर, गुजर सर, पी .एम.सुर्वे सर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी उमेश देशमुख,नंदू सुर्वे,हितेश पालीवाल,रमेश कोळी,नाना चौधरी,गुणवंत सरोदे,सुनील बाविस्कर,भूषण शिवदे, यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम कलाल यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन भाजपाचे जेष्ठ नेते शरद सोनार,ईश्वर देशमुख, सुरेश चौधरी,जनजागृती बहुउद्देशीय संस्था लोहारा यांनी केले होते.

Read More

जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षणात जामनेर तालुक्याचे प्रा.समीर घोडेस्वार व प्रा.सचिन गडाख यांना प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र देऊन सन्मानित:

जामनेर: महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 (माध्यमिक विभाग) “जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (TOT) २०२४-२५” चे आयोजन दि.३ ते ७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान जी एच रायसोनी कॉलेज शिरसोली रोड,जळगाव येथे करण्यात आले होते. या प्रशिक्षणात जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे हिंदी तथा क्रीडा उपशिक्षक प्रा.समीर विष्णू घोडेस्वार, व भौतिकशास्त्र उपशिक्षक प्रा.सचिन तानाजी गडाख यांनी उस्फूर्त सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव प्राचार्य डॉ.अनिल झोपे यांच्या हस्ते “प्रशिक्षणार्थी” म्हणून शासकीय प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले सोबत राज्यस्तरीय सुलभक डॉ.जगदीश पाटील, डॉ.अतुल इंगळे आदी. मान्यवरांची उपस्थिती होती.

Read More

ज्ञानगंगा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ग्रामपंचायतींना शैक्षणिक क्षेत्रभेट

ता.जामनेर __ : ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायतींना भेट देऊन लोकशाही प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागाचा अनुभव घेतला. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या पुस्तकाबाहेरचा अनोखा अनुभव ठरला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आंबीलहोळ, पळसखेडे, वाकी आणि तळेगाव येथील ग्रामपंचायतींना भेट देऊन त्यांच्या कामकाजाविषयी सखोल माहिती घेतली. त्यांनी ग्रामपंचायतीच्या अधिकार, कर्तव्ये, गावाच्या विकासासाठी होणारे उपक्रम आणि ग्रामसभेच्या कार्यपद्धतीविषयी समजून घेतले. सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांशी संवाद साधून त्यांनी शासकीय योजनांविषयी आणि ग्रामविकासाबाबत माहिती मिळवली. श्री. विजय कोळी, श्री. विनय खोंडे, श्री. विलास पाटील, श्री. अनिल देशमुख, श्री. रुपेश क्षिरसागर, सौ. स्नेहल पाटील, सौ. वंदना उंबरकर, सौ. मनीषा भारंबे आणि सौ. रोहिणी चौधरी मॅडम यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला. या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीविषयी जागरूकता निर्माण झाली. तसेच, भविष्यात गावाच्या विकासात योगदान देण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली. विद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. जे. सोनवणे, श्री. अशोक पालवे, सरपंच श्री. भिका तायडे, श्री. ललीत लामखेडे, श्री. राजेंद्र खरे, सौ. आरतीताई कोळी, दिलीप चव्हाण, प्रशांत वाघ, ग्रामसेवक श्री. योगेश पालवे, सौ. उज्वला महाजन, श्री. व्ही. एम. पवार, श्री. चिंतामण राठोड तसेच पालक व ग्रामस्थ यांच्या विशेष मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. या अनोख्या कृतीयुक्त उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष अनुभव मिळवल्याने त्यांना भविष्यात मोठा फायदा होईल, असे प्राचार्य श्री. आर. जे. सोनवणे यांनी वाकी येथे झालेल्या क्षेत्रभेटीच्या वेळी सांगितले.

Read More

अलवर (राजस्थान) येथे आयोजित खासदार क्रीडा महोत्सवास; केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित..

अलवर (राजस्थान) येथे स्थानिक लोकसभा खासदार व केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री श्री. भूपेंद्र यादव जी यांच्या मार्फत आयोजित “खासदार क्रीडा महोत्सव” कार्यक्रमास आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्या. यावेळी त्यांनी स्पर्धक व उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, अलवर खासदार क्रीडा महोत्सव ही केवळ क्रीडा स्पर्धा नाही, तर युवाशक्तीचा उत्साह, खिलाडूवृत्ती आणि निरोगी भारताच्या निर्धाराचे प्रतीक आहे. पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या ‘खेलो इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’ मोहिमेला पुढे नेण्यासाठी क्रीडा महाकुंभ हे एक सशक्त माध्यम आहे. युवा खेळाडूंचा उत्साह, परिश्रम आणि संघर्ष पाहून मला पूर्ण विश्वास वाटला की भारताचे भविष्य क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील कलागुणांना पुढे येण्याची मोठी संधी मिळत आहे असे उद्गार त्यांनी काढले. या भव्य कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी यावेळी स्थानिक खासदार व केंद्रीय मंत्री श्री. भूपेंद्र यादव जी यांचे यावेळी अभिनंदन करून सर्व सहभागी स्पर्धकांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Read More

निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

पळासखेडे मिराचे – धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लिमिटेड, शेंदुर्णी संचलित निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय, पळासखेडे मिराचे येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजयरावजी गरुड होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक डी. डी. बच्छाव सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेतील यश आणि भविष्यातील संधी याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव सागरमलजी जैन यांनी देखील आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना यशाच्या दिशेने वाटचाल करण्याचे मार्गदर्शन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील सर यांनी प्रास्ताविकात शाळेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. कार्यक्रमास ठानसिंग पाटील, दशरथ पाटील, संस्थेचे सहसचिव यू. यू. पाटील, ज्येष्ठ संचालक भीमराव पाटील, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य पदम बाबा, जनार्दन पवार, गायके बाबा, चंद्रकांत कुलकर्णी, संजय कुलकर्णी, कैलास साबळे, डी. पी. पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील सर, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी. टी. इंगळे सर यांनी केले तर व्ही. डी. पाटील सर यांनी आभारप्रदर्शन करून समारंभाची सांगता झाली.

Read More

रेल्वे अपघातात जवानाचा दुर्दैवी मृत्यू ,मूळ गावी दोंदवाडे (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडला

प्रतिनिधी श्रीरामपूर – भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले वीर जवान गणर जयवंत दिलीप परदेशी (आर्मी क्रमांक- 21022154X) यांचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 16 जानेवारी 2025 रोजी रात्री 8.00 वाजता घडली. जयवंत परदेशी हे श्रीरामपूर येथे आपल्या आजी-आजोबांच्या भेटीसाठी आले असताना अचानक समोरून येणाऱ्या गाडीची धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची नोंद घेतली. जवानाचे पार्थिव शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, श्रीरामपूर येथे पाठवण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर भारतीय सैन्यदलाने त्यांच्या पार्थिवाला सन्मानपूर्वक त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. गणर जयवंत दिलीप परदेशी हे कलकत्ता येथे सैन्यदलात कार्यरत होते. सुट्टीसाठी श्रीरामपूर येथे आले असताना रेल्वे अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 7.15 वाजता त्यांच्या मूळ गावी दोंदवाडे (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे शासकीय इतमामात आणि चालीरीतीनुसार अंत्यविधी पार पडला. त्यानंतर आज 25 जानेवारी 2025 रोजी दशक्रिया विधी कार्यक्रम संपन्न झाला असून तेरवीचा बछडीचा कार्यक्रम मंगळवार, 22 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. घटनेनंतर नामदार गिरीश महाजन यांच्या पत्नी साधनाताई महाजन यांनी कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि कुटुंबाला धीर दिला. वीर जवान जयवंत दिलीप परदेशी हे कुटुंबातील एकमेव कमावते होते. त्यांच्या पश्चात आई-वडील व एक बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली असून कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!