निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

पळासखेडे मिराचे – धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लिमिटेड, शेंदुर्णी संचलित निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय, पळासखेडे मिराचे येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजयरावजी गरुड होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक डी. डी. बच्छाव सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेतील यश आणि भविष्यातील संधी याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव सागरमलजी जैन यांनी देखील आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना यशाच्या दिशेने वाटचाल करण्याचे मार्गदर्शन केले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील सर यांनी प्रास्ताविकात शाळेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. कार्यक्रमास ठानसिंग पाटील, दशरथ पाटील, संस्थेचे सहसचिव यू. यू. पाटील, ज्येष्ठ संचालक भीमराव पाटील, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य पदम बाबा, जनार्दन पवार, गायके बाबा, चंद्रकांत कुलकर्णी, संजय कुलकर्णी, कैलास साबळे, डी. पी. पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील सर, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी. टी. इंगळे सर यांनी केले तर व्ही. डी. पाटील सर यांनी आभारप्रदर्शन करून समारंभाची सांगता झाली.

error: Don't Try To Copy !!