चिमुकल्या ‘यज्ञा ‘ वर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे

पहूर येथे संतप्त शालेय विद्यार्थ्यांनी पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन

पहूर ता जामनेर

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे यज्ञा जगदीश दुसाने या चिमुकलीवर अमानवी अत्याचारानंतर तिची निर्घृण हत्या करणाऱ्या विजय संजय खैरनार या नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, या तीव्र मागणीसाठी आज शुक्रवार दिनांक २१ / ११ / २०२५ रोजी पहूर येथे शालेय विद्यार्थ्यांनी मूक मोर्चा काढून निषेध नोंदविला .

छत्रपती शिवाजी महाराज चौकात दादासाहेब कॅप्टन एम . आर .लेले पहूर बस स्थानक येथून होणार मोर्चास प्रारंभ झाला .
आर . टी लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय , सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय आणि आर . बी .आर . माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी पोलीस ठाण्याच्या आवारात एकत्रित येऊन पहूर पोलीस

ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांना लेखी निवेदन दिले .
याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे , उपसरपंच राजू जाधव , आर .बी .आर .कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर महाजन , सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या पर्यवेक्षिका कल्पना बनकर हरिभाऊ राऊत शंकर भमेरे यांनी संतप्त भावना व्यक्त करून आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली .
याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते , आर . टी . लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक मधुकर आगारे , माजी सरपंच शंकर जाधव , ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे , तंटामुक्त गाव समितीचे

अध्यक्ष अर्जुन लहासे , सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष गिरीश भामेरे , पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष रवींद्र लाठे , शिक्षिका विद्यादेवी भालेराव , सुनिता पाटील , माधुरी बारी , सरोजिनी वानखेडे , डी . वाय . गोरे , बी . एन . जाधव , चंदेश सागर , नितीन पवार , अजय पाटील, दीपक पाटील हिरालाल भामेरे चंद्रकांत सोनार भरत सोनार , रतन सोनार , गजानन सोनार , जितेंद्र सोनार , चेतन रोकडे , तुषार बनकर , राहुल ढेंगाळे यांच्यासह संताप्त पहुरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते .

error: Don't Try To Copy !!