प्रतिनिधी
लोहारा तालुका पाचोरा येथे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील तीन वर्ष चिमुरडीवर झालेल्या अत्याचारा प्रकरणी आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत लोहारा मार्केट पूर्ण दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आला होता या बंदला गावातील व्यापारी, तरुण, तरुणी, नागरिक महिला यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
नाशिकच्या मालेगावमधील एका 3 वर्षांच्या चिमुरडीच्या हत्या
प्रकरणानं अवघा महाराष्ट्र हादरला आहे.
सकाळी 9:00 वाजता लोहारा बस स्टॅन्ड परिसरापासून गावातून मुलींनी हातात निषेध नोंदवणारे पोस्टर घेऊन रॅली काढून आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या.
आरोपीचा फोटो पेटवण्यात आला व त्याला असाच उभा पेटवा असा मानस व्यक्त केला.
या रॅलीमध्ये सामाजिक कार्यकर्ते, तरुण तरुणी पुरुष महिला, पत्रकार बांधव उपस्थित होते.
