खडकी गावात संत सेवालाल महाराज जयंती भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक वेशभूषा आणि स्वच्छता अभियान राबवत गावकऱ्यांनी एक आदर्श उपक्रम साकारला. संपूर्ण गावाच्या सहभागातून झालेल्या या उपक्रमामुळे सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन सुशील भाऊ नाईक यांनी केले होते. कार्यक्रमाला राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन तसेच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे जयंती उत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त झाले.
खडकी ता. जामनेर येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी
