
जळगाव जिल्हा ठरतोय सक्षम भागीदार$1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रकल्प व कार्यक्रम व्यवस्थापन युनिट (DPPMU) मार्फत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. महाराष्ट्राच्या $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या ध्येयपूर्तीसाठी जिल्हा जळगावातील यंत्रणांच्या कामगिरीचा सखोल आढावा या बैठकीत घेण्यात आला. आजच्या बैठकीतील प्रमुख मुद्दे:• कृषी, आरोग्य, पर्यटन, वैद्यकीय सुविधा, उद्योग, वीज, जलव्यवस्थापन, शिक्षण आदी १६ क्षेत्रांतील प्रगतीचा तालुका स्तरावर आढावा.• जिल्हास्तरावर संस्थात्मक बांधणी (Institution Building) आणि गुणवत्तापूर्ण सेवा केंद्रांची निर्मिती या दिशेने मार्गदर्शन.• विभागीय समन्वय वाढवणे, कामांच्या वेळेत पूर्ततेसाठी नियोजन, व संकल्पनांची अंमलबजावणी यावर भर.• डेटा आधारित धोरणनिर्मितीसाठी विश्लेषण व प्रगती निर्देशांक तयार करण्याचे निर्देश. महत्त्वाच्या आगामी बैठका:• District Innovation Council ची बैठक – नाविन्यपूर्ण उपक्रमांची निवड व प्रोत्साहन.• Skill & Employment Conclave – कौशल्य विकास संस्था, उद्योग व तरुण यांच्यात समन्वय.• Export Branding Workshop – जळगावातील केळी, सोने, कापूस, प्लास्टिक यांचा आंतरराष्ट्रीय ब्रँडिंगसाठी विशेष योजना.• Infrastructure Taskforce बैठक – वीज, पाणी, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, वाहतूक व पायाभूत सुविधा या क्षेत्रांवर लक्ष. प्रगतिपथावर असलेले महत्त्वाचे उपक्रम:• जळगाव वैद्यकीय हब – आरोग्य सेवांमध्ये खाजगी गुंतवणूक व तांत्रिक पायाभूत सुविधा निर्माण.• केळी क्लस्टरचा विकास – निर्यातक्षम व प्रक्रिया आधारित सुविधा उभारणी.• पशुसंवर्धन क्लिनिक आणि डायल 1962 सेवा – पशु वैद्यकीय आपत्कालीन सेवा अधिक प्रभावी करणे.• MSME व SHG सक्षमीकरण – वित्त, प्रशिक्षण, मार्केट लिंक यामध्ये सहकार्य.• पर्यटन विकास – सापुतडा डोंगररांगा, धार्मिक व सांस्कृतिक स्थळांचा विकास.• शाश्वत शेती व जल व्यवस्थापन – सूक्ष्म सिंचन, जलसंधारण, आणि नवा जल व्यवस्थापन मॉडेल. 📊 DPPMU (District Project & Program Monitoring Unit) मार्फत या सर्व योजनांचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. यातूनच “Vision to Action” चा खरा अर्थ पूर्णत्वास जातो आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक, संस्था, उद्योजक आणि तरुणांनी या परिवर्तनामध्ये आपली भूमिका बजावावी. तुमचे कल्पक विचार, सहकार्य आणि पुढाकारच जिल्ह्याला राज्यात आदर्श बनवतील.