मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत भव्य रोगनिदान व शस्त्रक्रिया शिबिर


जामनेर :(प्रतिनिधी) जामनेर तालुक्याचे भाग्यविधाता म्हणून ओळखले जाणारे मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त कमल फाउंडेशन, जामनेर यांच्या वतीने भव्य मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार दि. 17 मे 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत एकलव्य माध्यमिक विद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज नगर, जळगाव रोड, जामनेर येथे पार पडणार आहे.
या शिबिरात विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कॅन्सर, हृदयरोग, हाडांचे विकार, मूत्ररोग, न्यूरोसर्जरी, जनरल सर्जरी, बालरोग, स्त्रीरोग, नेत्र तपासणी आदी विभागातील नामांकित तज्ज्ञ डॉक्टर नागरिकांची तपासणी करणार आहेत.
शिबिरात डॉ. निलेश चांडक, डॉ. प्रितेश कोठारी, डॉ. मनोज पाटील, डॉ. मनोज टोके, डॉ. टी. पी. महाजन, डॉ. सचिन साठे, डॉ. भूषण पाटील, डॉ. निखिल पाटील, डॉ. रविंद्र सुखक्कर, डॉ. अभिनव नाईक, डॉ. मृण्णा सोमाणी, डॉ. सौरभ पाटील, डॉ. सतीष चौधरी, डॉ. नेहा काबरा, डॉ. गिरधारी जेधे तसेच डॉ. पांडुरंग अल्टाट यांसारखे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.
शिबिरासाठी येताना नागरिकांनी आपले जुने वैद्यकीय रिपोर्ट सोबत आणावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या उपक्रमास कमल हॉस्पिटल व मॅटर्निटी होम, जामनेर यांचे सहकार्य लाभले असून भारतीय जनता पार्टी, जामनेर यांचे विशेष सहकार्य आहे. आयोजनाची जबाबदारी कमल फाउंडेशन, जामनेर यांनी स्वीकारली आहे.

error: Don't Try To Copy !!