का. आ. विद्यालय तोरणाळे चे एस.एस.सी. परीक्षेत यश


===================वाकडी.जामनेर.दि.११/०५/२६
तोरणाळे- श्री ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ तोरणाळे, संचलित काशीराम आनंदा विद्यालयाचा एसएससी परीक्षा मार्च २०२६ चा निकाल ९७..०२% असून, सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल १००% लागलेला असून यशाची परंपरा कायम राखली आहे.
शाळेतील गुणाानुक्रमे प्रथम भूमिका रविंद्र पाटील ९१.८०%, द्वितीय सुजल नंदकिशोर पाटील ८९.२०%, तृतीय नंदनी गजानन इंगळे ८८.४०% यांनी घवघवीत यश संपादन केले.


सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष बाबुराव आनंदा पाटील, उपाध्यक्ष, सचिव व सर्व संचालक मंडळातर्फे तसेच शाळेच्या मुख्याध्यापक व मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू यांनी अभिनंदन केले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे परिसरात कौतुक होत आहे.

error: Don't Try To Copy !!