JBN Maharashtra News

JBN Maharashtra News Jalgaon मराठी वृत्त वाहिनी

पुनर्वसनाच्या प्रलंबित प्रश्नांना मिळणार गती; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक आढावा बैठक

पुनर्वसनाच्या प्रलंबित प्रश्नांना मिळणार गती; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक आढावा बैठकजळगाव, दि. २ जून (प्रतिनिधी) जिल्ह्यातील पुनर्वसन विषयक प्रलंबित प्रश्नांचा तातडीने निपटारा करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित विभागांची व्यापक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पुनर्वसित गावठाणांतील विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.बैठकीत पात्र लाभार्थ्यांना भूखंड वाटप, पुनर्वसित क्षेत्रातील रस्ते, पाणीपुरवठा व वीज यांसारख्या नागरी सुविधांची सद्यस्थिती, भूमी अभिलेख विभागाकडे प्रलंबित असलेल्या जमीन मोजणीची प्रकरणे, न्यायालयीन बाबी तसेच प्रकल्पग्रस्तांच्या स्थानिक अडचणींचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.यावेळी जिल्हा अधीक्षक (भूमी अभिलेख), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), उपजिल्हाधिकारी, पाटबंधारे, मध्यम प्रकल्प व धरण विभागाचे कार्यकारी अभियंते, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेख हे प्रत्यक्ष व दूरचित्रवाणी प्रणालीद्वारे (व्हीसी) उपस्थित होते.प्रकल्पग्रस्तांचे हित लक्षात घेऊन सर्व विभागांनी परस्पर समन्वय वाढवून प्रलंबित विषयांना गती द्यावी व निर्धारित कालमर्यादेत त्यांची पूर्तता करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. या बैठकीमुळे जिल्ह्यातील पुनर्वसनाशी संबंधित अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read More

बोदवड शहरातील पाणीपुरवठा विहिरीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

बोदवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ईदगाह परिसरातील रस्त्यालगत असलेल्या विहिरीला अद्याप सुरक्षा जाळी बसविण्यात आलेली नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर बाबीकडे नगर पंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शहर विकास आघाडीने केला आहे. शहर विकास आघाडीच्या म्हणण्यानुसार, संबंधित विहिरीत भविष्यात एखादा प्राणी किंवा पक्षी पडल्यास पाणी दूषित होण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. यापूर्वी सारोळा पाणीपुरवठा योजनेच्या टाकीत बैल पडून मृत झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. पाणीपुरवठा विहिरीवर त्वरित सुरक्षा जाळी बसविण्याची मागणी करत शहर विकास आघाडीने नगर पंचायत प्रशासनाला इशारा दिला आहे. मागणीची दखल न घेतल्यास शहरभर “भीक मागो आंदोलन” छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, या आरोपांबाबत नगर पंचायत प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Read More

अतिवृष्टी अनुदानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन; आठ दिवसांत निधी वर्गाचे आश्वासन

जळगाव : अतिवृष्टी अनुदान वेळेत न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे धाव घेत अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांना निवेदन सादर केले. लवकरात लवकर निधी न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर निधी वर्ग करण्यात येईल असे आश्वासन दिले. याशिवाय शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महसूल अधिकारी अंगद कासटकर यांचीही भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. कासटकर यांनी जामनेर तहसीलदारांशी तत्काळ दूरध्वनीवरून चर्चा केली आणि येत्या आठ दिवसांत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट निधी वर्ग करण्यात येईल असे स्पष्ट केले. या आंदोलनात सुभाष ठोंबरे, अविनाश पाटील, गोपाल कदम, समाधान चौधरी, प्रकाश ठोंबरे, अशोक ढगे, रामचंद्र पवार, अजय मराठे आणि विशाल भगत यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Read More

जामनेर – बीजेएस कार्यकर्ता सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर प्रतिनिधीभारतीय जैन संघटनेच्या(बीजेएस)40 वर्षाच्या इतिहासात प्रथमतः ग्राउंड लेव्हलच्या कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्ता सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या प्रेरणेने व मॅनेजिंग डायरेक्टर कोमल जैन यांच्या मार्गदर्शनाने दिनांक 7 मे 2026 रोजी संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान आधी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून 288 पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला.कार्यक्रमाची सुरुवात नमस्कार महामंत्राने करून सुरुवातीला संघटनेच्या सामुदायिक विवाह कार्यक्रम ज्यात शांतीलाल मुथा यांच्या मुलांचा विवाह केला होता. त्यानंतर परिचय संमेलन, 1993 मधील लातूर भूकंप,जम्मू कश्मीर अंदमान निकोबार, नेपाळ , मेळघाट येथील कामे, 2018 मध्ये पाण्याच्या संदर्भात बुलढाणा येथे पायलट प्रोजेक्ट,2024 मध्ये भारतातील 100 शहरे जल पर्याप्त म्हणून पर्यंत घेतले, 2019 पासून मूल्यवर्धन शिक्षण, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार आदी कामांची माहिती कोमल जैन यांनी दिली.यानंतर संघटना परिवार व नातेसंबंध, मूल्य आणि आचरण,प्राकृतिक संसाधनाचे रक्षण, शिक्षण विकास, नैसर्गिक आपत्ती, आरोग्य संपदा व भ्रमण या 7 बाबींवर काम करीत असल्याचे सांगितले.संघटनेच्या बास्केटमध्ये वर्षभरातील 14फाउंडेशन कार्यक्रम याशिवाय स्मार्ट गर्ल,एमएसएमई,परिणय पथ,कपल एम्पॉवरमेंट आदी व नव्याने येत असलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच शाखा म्हणजे काय,स्थापना कशी करावी, कार्यकारणी किती सदस्यांची असावी, आर्थिक नियोजन कसे करावे याबाबत ऊहापोह केला गेला. देशात बारा राज्यात संघटनेची कार्य असून एकूण 700 शाखा व 50 हजार कार्यकर्ते आहेत.राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी पंकज चोपडा दिनेश पालरेचा, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष केतन शहा, राज्य महासचिव प्रवीण पारख,राज्य उपाध्यक्ष विनय पारख, राज्य सचिव, राज्य कार्यकारणीखान्देश विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा ,अशोक राखेचा,विभाग उप अध्यक्ष सुमित मुनोत, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष अल्पेश जैन,जलगांव जिल्हा सचिव दर्शन जैन,जामनेर महिला अध्यक्ष मोना चोरड़िया आणि मुख्य कार्यालयाकडून अमित ढाणे,अभिजीत पेटकर, विविध शाखांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.असे प्रशिक्षण नियमितपणे सुरू राहणार असल्याचे कोमल जैन यांनी सांगितले.

Read More

जामनेरमध्ये सरकारी तांदळाचा काळाबाजार उघड ?

255 क्विंटल तांदूळ भरलेला ट्रक ताब्यात; पुरवठा विभाग व पोलिसांची कारवाई, मात्र अधिकाऱ्यांची माहिती देण्यास टाळाटाळजामनेर : गोरगरीब नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून दिल्या जाणाऱ्या सरकारी धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याचा संशय पुन्हा एकदा बळावला आहे. जामनेर तहसीलच्या पुरवठा विभागाने आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 200 पेक्षा अधिक पोती तांदूळ वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फत्तेपूरहून पहूरच्या दिशेने जाणारा हा संशयित ट्रक जामनेर येथे अडवण्यात आला. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल 255 क्विंटलपेक्षा अधिक तांदूळ आढळून आला. या तांदळाबाबत काही पत्रकारांनी हा साठा सरकारी रेशनिंगचा असल्याचा संशय व्यक्त केला आहे.कारवाईनंतर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे अधिकारी नारायण सुर्वे यांनी पंचनामा केला. मात्र हा तांदूळ नेमका कुठून आणण्यात आला?, कोणाकडून खरेदी करण्यात आला?, आणि तो नेमका कुठे नेला जात होता? याबाबत अधिकृत माहिती अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे.विशेष म्हणजे, तहसीलदार आणि पुरवठा विभागाकडून अद्याप कोणताही अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. केवळ “ही गाडी बुलढाणा येथून आली असून पाचोराच्या दिशेने जात होती,” एवढीच माहिती देण्यात आली. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणातील तांदूळ साठ्याबाबत माहिती लपवली जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.दरम्यान, सरकारकडून रेशन कार्डधारकांना दर महिन्याला मोफत तांदूळ, गहू तसेच ज्वारीचे वाटप केले जाते. त्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना धान्य पुरवठा केला जातो. मात्र अनेकदा लाभार्थ्यांना पूर्ण धान्य दिले जात नसल्याच्या तक्रारी समोर येतात. काही लाभार्थी धान्य घेण्यासाठी न आल्यास त्यांच्या हिस्स्याचे धान्य काळ्या बाजारात विकले जात असल्याचे आरोप वारंवार होत आले आहेत.जामनेरमध्ये पकडण्यात आलेला हा मोठा तांदळाचा साठा नेमका सरकारी धान्याचा आहे का?, यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे?, आणि या प्रकरणात कोणकोण सामील आहे? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील तपासात धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.याप्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Read More

का. आ. विद्यालय तोरणाळे चे एस.एस.सी. परीक्षेत यश

===================वाकडी.जामनेर.दि.११/०५/२६तोरणाळे- श्री ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ तोरणाळे, संचलित काशीराम आनंदा विद्यालयाचा एसएससी परीक्षा मार्च २०२६ चा निकाल ९७..०२% असून, सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल १००% लागलेला असून यशाची परंपरा कायम राखली आहे.शाळेतील गुणाानुक्रमे प्रथम भूमिका रविंद्र पाटील ९१.८०%, द्वितीय सुजल नंदकिशोर पाटील ८९.२०%, तृतीय नंदनी गजानन इंगळे ८८.४०% यांनी घवघवीत यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष बाबुराव आनंदा पाटील, उपाध्यक्ष, सचिव व सर्व संचालक मंडळातर्फे तसेच शाळेच्या मुख्याध्यापक व मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू यांनी अभिनंदन केले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे परिसरात कौतुक होत आहे.

Read More

मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत भव्य रोगनिदान व शस्त्रक्रिया शिबिर

जामनेर :(प्रतिनिधी) जामनेर तालुक्याचे भाग्यविधाता म्हणून ओळखले जाणारे मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त कमल फाउंडेशन, जामनेर यांच्या वतीने भव्य मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार दि. 17 मे 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत एकलव्य माध्यमिक विद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज नगर, जळगाव रोड, जामनेर येथे पार पडणार आहे.या शिबिरात विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कॅन्सर, हृदयरोग, हाडांचे विकार, मूत्ररोग, न्यूरोसर्जरी, जनरल सर्जरी, बालरोग, स्त्रीरोग, नेत्र तपासणी आदी विभागातील नामांकित तज्ज्ञ डॉक्टर नागरिकांची तपासणी करणार आहेत.शिबिरात डॉ. निलेश चांडक, डॉ. प्रितेश कोठारी, डॉ. मनोज पाटील, डॉ. मनोज टोके, डॉ. टी. पी. महाजन, डॉ. सचिन साठे, डॉ. भूषण पाटील, डॉ. निखिल पाटील, डॉ. रविंद्र सुखक्कर, डॉ. अभिनव नाईक, डॉ. मृण्णा सोमाणी, डॉ. सौरभ पाटील, डॉ. सतीष चौधरी, डॉ. नेहा काबरा, डॉ. गिरधारी जेधे तसेच डॉ. पांडुरंग अल्टाट यांसारखे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.शिबिरासाठी येताना नागरिकांनी आपले जुने वैद्यकीय रिपोर्ट सोबत आणावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.या उपक्रमास कमल हॉस्पिटल व मॅटर्निटी होम, जामनेर यांचे सहकार्य लाभले असून भारतीय जनता पार्टी, जामनेर यांचे विशेष सहकार्य आहे. आयोजनाची जबाबदारी कमल फाउंडेशन, जामनेर यांनी स्वीकारली आहे.

Read More

पहूर कसबे ग्रामसभेत अधिकाऱ्यांवर संतप्त हल्लाबोल !आजी – माजी ग्रामविकास अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव? ग्रामस्थांनी वाचला समस्यांचा पाढा !

पहूर, ता. जामनेर :पहूर कसबे ग्रामपंचायत कार्यालयातील आजची ग्रामसभा संतापाच्या वातावरणात पार पडली. तब्बल दहा महिने उलटूनही माजी ग्रामविकास अधिकाऱ्याने दप्तर सुपूर्द केले नाही, या गंभीर प्रकारावरून ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला जाब विचारला. माजी प्रशासक रामचंद्र वानखेडे यांनी थेट सवाल करत प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जनतेला वेठीस धरून नेमकं कोणाचं रक्षण केलं जातंय?” असा त्यांचा संतप्त सवाल सभागृहात चर्चेचा विषय ठरला. गुरुवारी (ता. ७) सकाळी ९ वाजता प्रशासक सौ. आशाताई शंकर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. या वेळी विद्यमान ग्रामविकास अधिकारी शिवदास गव्हाळे यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की,माजी ग्रामविकास अधिकारी अशोक बाविस्कर यांनी केवळ चालू वर्षाचा चार्ज दिला असून, मागील कार्यकाळातील दप्तर अद्याप त्यांच्याच ताब्यात आहे. या प्रकारामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. सार्वजनिक कार्यालयाचे दप्तरच उपलब्ध नसेल, तर जनतेला माहिती वेळेत कशी मिळणार ? असा सवाल उपस्थित करण्यात आला. दरम्यान तत्कालीन ग्रामविकास अधिकारी अशोक बाविस्कर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की सदर दप्तर हे ग्रामपंचायत कार्यालयातच आहे, शासकीय दप्तर मी घरी कशाला घेऊन येऊ? असा प्रश्न करून त्यांनी दप्तर ग्रामपंचायत मध्येच शोधण्याचा सल्ला दिला. माहिती अधिकारालाही अडथळादप्तर उपलब्ध नसल्यामुळे माहिती अधिकाराखाली मागविलेली माहिती वेळेत देता येत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, संबंधितांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. पार्टटाईम अधिकाऱ्यांमुळे कारभारावर परिणाम पहूर कसबे सारख्या मोठ्या गावासाठी पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नसणे ही गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांनी मांडले. विद्यमान अधिकारी शिवदास गव्हाळे यांच्याकडे रांजणी गावाचाही कार्यभार असल्याने स्थानिक समस्या दुर्लक्षित होत असल्याची तक्रार करण्यात आली. पहूरसाठी कायमस्वरूपी अधिकारी नेमण्याची मागणी करण्यात आली. ग्रामस्थांनी मांडल्या विविध समस्याग्रामसभेत नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. वाघूर धरणाची पाणी योजना अद्याप सुरू न होणे याविषयी मधुकर पवार अशोक जाधव यांनी आवाज उठविला .स्मशानभूमी व गावातील रस्त्यांची दुरवस्था, वैकुंठ रथ व शववाहिकेची गरज, शेंदुर्णी मार्गावरील दिव्यांची अनियमितता, जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सवलत देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते ईश्वर हिवाळे यांनी केली . गट क्रमांक १३५८ अतिक्रमण हटविण्याची तीव्र मागणी माजी उपसरपंच युसूफ बाबा यांनी करून पोलीस बंदोबस्तात कारवाई करावी अन्यथा आंदोलन छडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला .श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर परिसरातील पर्यटन विभागाअंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांमध्ये ठेकेदारांची मनमानी व दडपशाही याविषयी विश्वस्त किशोर बनकर व अशोक जाधव यांनी आवाज उठवला . ग्रामसभेच्या प्रारंभी प्रगणक शंकर भामेरे यांनी नागरिकांना स्वगणनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. सभेला आजी-माजी पदाधिकारी, प्रशासकीय समिती सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. एकूणच, दप्तर न सुपूर्द करण्याच्या प्रकारामुळे पहूर कसबे ग्रामपंचायतीतील प्रशासनाचा कारभार चर्चेत आला असून, आता या प्रकरणात ठोस कारवाई होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read More

हिंदू सूर्य महाराणा प्रताप जयंतीनिमित्त भाजप कार्यालयात अभिवादन

जामनेर (प्रतिनिधी): शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी जामनेर शहर कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, सरचिटणीस अतिश झाल्टे, शहर मंडळ अध्यक्ष रविंद्र रमेश झाल्टे, डॉ. प्रशांत भोंडे, दिपक तायडे, बाबुराव हिवराळे, सुहास पाटील, मुकुंदा सुरवाडे, दत्तू जोहरे, सुनील पाटील, प्रल्हाद सोनवणे, सुभाष पवार, गोकुळ माळी, पप्पू पाटील, दिपक डांगी, योगेश मोते आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी महाराणा प्रताप यांच्या पराक्रम, त्याग आणि स्वाभिमानाच्या आदर्शातून प्रेरणा घेत राष्ट्रसेवेचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमात राष्ट्रभक्तीचा उत्साहपूर्ण माहोल निर्माण झाला होता. 🚩

Read More

निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार एस.एस.सी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

पळसखेडे मिराचे, प्रतिनिधी : धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी, शेंदुर्णी संचलित निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय, पळसखेडे मिराचे येथे फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेत सेमी व मराठी माध्यमातून प्रथम पाच क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज दि. 9 मे रोजी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री व्ही. आर. पाटील सर प्रमुख उपस्थित होते. तसेच इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक श्री व्ही. डी. पाटील सर, श्री जी. पी. पाटील सर, श्री पी. के. राजपूत सर, श्री व्ही. ए. पाटील सर, सीनियर क्लार्क श्री के. आर. सोनवणे भाऊसाहेब तसेच ग्रंथपाल श्री डी. एस. बोरसे सर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. यावेळी विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी मुख्याध्यापक आदरणीय नानासाहेब यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत यशाची परंपरा कायम राखण्यासाठी मेहनत, सातत्य व शिस्त यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते.

Read More
error: Don't Try To Copy !!