जामनेर (प्रतिनिधी) दि. २६-११-२०२५ रोजी सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय जामनेर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालायातील विद्यार्थिनी मोठ्या संखेने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.चित्रा परदेशी मैडम यांनी केले.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रा.आय.एम.चोरडिया सर हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले.यानंतर प्रा.प्राची पाटील मैडम यांच्यासह सर्व प्राध्यापक व विद्यार्थिनी यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे सामूहिक वाचन केले.यावेळी प्रा.चोरडिया सर यांनी संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन प्रा.रूपाली लोहार मैडम व कल्याणी सरताळे मैडम यांनी केला.

