जामनेर तालुक्यातील शेतकऱ्याना पीककर्ज भरण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांकडून तगादा लावण्यात येत आहे.तर बँकांनी पीककर्ज थकीत शेतकऱ्यांच्या बचत खात्याला होल्ड लावला आहे.
एकीकडे पूर परिस्थितीमुळे हाताचे पिक वाया गेले आहे तर दुसरीकडे जेमतेम उत्पन्न शेतकऱ्याच्या घरात येण्यास सुरुवात झाली आहे.तर पिक मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक टंचाईत सापडला आहे.
या सर्व गोष्टींचा परिणाम कमी की काय म्हणून राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्ज न भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या बचत खात्याला होल्ड लावला आहे.
शासनाने पीककर्ज वसुली साठी तगादा लावू नये असे आदेश असताना देखील मात्र राष्ट्रीयकृत बँकांना यांची काही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे.
तरी राज्यातील शासनाने या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन याकडे बँकांना सक्त आदेश देऊन याबाबत कठोर कारवाई बँकावर करण्यात यावी ही मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
