पाळधी – गावात मध्यरात्री दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये काहीशी दहशत निर्माण झाली आहे.
राजेंद्र सुभाष परदेशी (रा. पाळधी ता. जामनेर) यांनी आपली युनिकान दुचाकी क्रमांक MH 19 EC 6474 ही दिनांक ०२/१२/२०२७ रोजी संध्याकाळी सुमारे ५ वाजता घरासमोर लॉक करून उभी केली होती. परंतु अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेल्याची तक्रार त्यांनी पहूर पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली आहे.
दरम्यान, नितीन भास्कर माळी (रा. पाळधी) हे पुण्यात कामानिमित्त गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील वस्तूंची नासधूस केली असून काय चोरीस गेले आहे याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही.
या दोन्ही गुन्ह्यांचा पहूर पोलीस ठाण्याकडून समांतर तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून पुढील तपास सुरू आहे.



