मानसिंग आप्पांचा ८१ वर्षांचा सुवर्णप्रवास — सहस्रचंद्र दर्शनाचा अनोखा गौरव सोहळा संपन्न..!

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर
बोदवड प्रतिनिधी
आज आत्मसन्मान फाउंडेशन, बोदवड येथे आपल्या सर्वांचे आदरणीय माझ्या परिवाराचे कायम ऋणानुबंध असलेले गो.बा.ढाके महाविद्याल ऐणगावचे सेवानिवृत्त प्रयोगशाळा सहाय्यक उत्सवमूर्ती मा. मानसिंग आप्पा पाटील यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. हा कार्यक्रम आप्पांच्या परिवाराने घडवून आणला.
या प्रसंगी मंचावर ॲड. जगनदादा लोखंडे,

पुरुषोत्तम गड्डम सर, गोपालजी अग्रवाल, डॉ. विजय पाटील, डॉ. सुधीर पाटील, भरत आप्पा पाटील, पवन राजे पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री. रोहन लोखंडे यांनी केले. प्रस्ताविक भरतसिंह राजपूत यांनी मांडले तर आभार प्रदर्शन अतुल पाटील व विशाल पाटील यांनी केले.
व्यासपीठावरील मान्यवरांनी मा. मानसिंग आप्पा पाटील यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर प्रकाश टाकत त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. 🌿


पर्यावरण प्रेमी संजय वराडे यांच्या हस्ते फणस वृक्षाची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश देण्यात आला.
आप्पांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आत्मसन्मान फाउंडेशन येथील मनोयात्रींना स्नेहभोजन देण्यात आले. या आनंददायी सोहळ्याला आप्पांचा संपूर्ण परिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री महेंद्रसिंग सर व संपूर्ण परिवार यांनी परिश्रम घेतले.
हा सोहळा म्हणजे केवळ वाढदिवस नव्हे, तर एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा सन्मान आणि जीवनमूल्यांचा उत्सव होता.

error: Don't Try To Copy !!