भारतीय जैन संघटनेतर्फे जामनेरला बालकांसाठी विविध कार्यक्रम संपन्न


( जामनेर -प्रतिनिधी )- येथील भारतीय जैन संघटनेतर्फे बाल दिनानिमित्त पाच वर्षापासून ते वीस वर्षापर्यंतच्या बालकांसाठी महावीर भवन येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन बाल दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात बालकांसाठी खो-खो,संगीत खुर्ची,रस्सीखेच,पास कप खेळांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धाही ठेवण्यात आल्या होत्या या स्पर्धेत 115 बालकांनी सहभाग नोंदविला. ज्या मुलांनी स्पर्धेत विजय मिळवला त्यांना बक्षिसे देण्यात आली. राकेश हिरालालजी संचेती हे प्रायोजक म्हणून होते.जळगाव जिल्हा महिला विंग जिल्हाध्यक्षा सोनल कोठारी यांनी सुत्रसंचलन

केले. खानदेश विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत, जिल्हा उपाध्यक्ष विकास कोठारी, माजी जिल्हा कार्याध्यक्ष शितल लोढा, जय बोहरा, रितेश कोठारी, विशाल ओस्तवाल एवं बीजेएस महिला अध्यक्षा सौ. मोना चोरडीया, सदस्या सौं जयश्री लोढा, सौ. सोनाली सिसोदीया, महावीर पाठशाळा प्राध्यापक सौ. वनमाला कोठारी, सौ वैशाली बागमार, सौ. सपना ब्रम्हेचा, सौ. ऊषा पोरवाल, सौ. रोशनी भंडारी, सौ.शितल संचेती, सौ. नमिता चोपडा,आदी पदाधीकारी उपस्थित होते. प्रोजेक्ट हेड म्हणून विकास ललवाणी, सौ दिपाली चोरडिया यांनी काम पाहीले.

error: Don't Try To Copy !!