अलवर (राजस्थान) येथे आयोजित खासदार क्रीडा महोत्सवास; केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित..

अलवर (राजस्थान) येथे स्थानिक लोकसभा खासदार व केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री श्री. भूपेंद्र यादव जी यांच्या मार्फत आयोजित “खासदार क्रीडा महोत्सव” कार्यक्रमास आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्या.

यावेळी त्यांनी स्पर्धक व उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, अलवर खासदार क्रीडा महोत्सव ही केवळ क्रीडा स्पर्धा नाही, तर युवाशक्तीचा उत्साह, खिलाडूवृत्ती आणि निरोगी भारताच्या निर्धाराचे प्रतीक आहे.

पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या ‘खेलो इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’ मोहिमेला पुढे नेण्यासाठी क्रीडा महाकुंभ हे एक सशक्त माध्यम आहे. युवा खेळाडूंचा उत्साह, परिश्रम आणि संघर्ष पाहून मला पूर्ण विश्वास वाटला की भारताचे भविष्य क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील कलागुणांना पुढे येण्याची मोठी संधी मिळत आहे असे उद्गार त्यांनी काढले.

या भव्य कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी यावेळी स्थानिक खासदार व केंद्रीय मंत्री श्री. भूपेंद्र यादव जी यांचे यावेळी अभिनंदन करून सर्व सहभागी स्पर्धकांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

error: Don't Try To Copy !!