ता.जामनेर __ : ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायतींना भेट देऊन लोकशाही प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागाचा अनुभव घेतला. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या पुस्तकाबाहेरचा अनोखा अनुभव ठरला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आंबीलहोळ, पळसखेडे, वाकी आणि तळेगाव येथील ग्रामपंचायतींना भेट देऊन त्यांच्या कामकाजाविषयी सखोल माहिती घेतली. त्यांनी ग्रामपंचायतीच्या अधिकार, कर्तव्ये, गावाच्या विकासासाठी होणारे उपक्रम आणि ग्रामसभेच्या कार्यपद्धतीविषयी समजून घेतले. सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांशी संवाद साधून त्यांनी शासकीय योजनांविषयी आणि ग्रामविकासाबाबत माहिती मिळवली.

श्री. विजय कोळी, श्री. विनय खोंडे, श्री. विलास पाटील, श्री. अनिल देशमुख, श्री. रुपेश क्षिरसागर, सौ. स्नेहल पाटील, सौ. वंदना उंबरकर, सौ. मनीषा भारंबे आणि सौ. रोहिणी चौधरी मॅडम यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला.
या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीविषयी जागरूकता निर्माण झाली. तसेच, भविष्यात गावाच्या विकासात योगदान देण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली. विद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. जे. सोनवणे, श्री. अशोक पालवे, सरपंच श्री. भिका तायडे, श्री. ललीत लामखेडे, श्री. राजेंद्र खरे, सौ. आरतीताई कोळी, दिलीप चव्हाण, प्रशांत वाघ, ग्रामसेवक श्री. योगेश पालवे, सौ. उज्वला महाजन, श्री. व्ही. एम. पवार, श्री. चिंतामण राठोड तसेच पालक व ग्रामस्थ यांच्या विशेष मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.
या अनोख्या कृतीयुक्त उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष अनुभव मिळवल्याने त्यांना भविष्यात मोठा फायदा होईल, असे प्राचार्य श्री. आर. जे. सोनवणे यांनी वाकी येथे झालेल्या क्षेत्रभेटीच्या वेळी सांगितले.