जामनेर: महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 (माध्यमिक विभाग) “जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (TOT) २०२४-२५” चे आयोजन दि.३ ते ७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान जी एच रायसोनी कॉलेज शिरसोली रोड,जळगाव येथे करण्यात आले होते.
या प्रशिक्षणात जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे हिंदी तथा क्रीडा उपशिक्षक प्रा.समीर विष्णू घोडेस्वार, व भौतिकशास्त्र उपशिक्षक प्रा.सचिन तानाजी गडाख यांनी उस्फूर्त सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव प्राचार्य डॉ.अनिल झोपे यांच्या हस्ते “प्रशिक्षणार्थी” म्हणून शासकीय प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले सोबत राज्यस्तरीय सुलभक डॉ.जगदीश पाटील, डॉ.अतुल इंगळे आदी. मान्यवरांची उपस्थिती होती.