जामनेर -भारतीय जैन संघटनेची व्यापारी सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न


जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर
जामनेर प्रतिनिधी
जामनेर येथील व्यपाऱ्यांना उद्योग-व्यवसायात अधिक सक्षम बनविण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या व व्यापारी एसोसिएशन यांच्या वतीने विशेष कार्यशाळेचे येथील महावीर भवन मध्ये आयोजन करण्यात आले.
खानदेशात तळोदा,शहादा,शिरपूर, धुळे,शिंदखेडा, पाचोरा , जळगांव या सात ठिकाणी कार्यशाळा होऊन जामनेर येथील ही 8 वी कार्यशाळा असून, राज्य अध्यक्ष केतन शहा, राज्य महासचिव प्रवीण पारख

यांच्या मार्गदर्शनाने व उपाध्यक्ष विनय पारख, खानदेश विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा यांच्या प्रयत्नाने केले गेले असल्याचे विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक म्हणून सुनील भवरीलालजी गादीया यानी सहकार्य केले.
या कार्यशाळेत उद्योजकतेसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सखोल माहिती देण्यात आली.कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून निरंजन जैन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी उद्योग-व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांची माहिती, त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया, तसेच कर्जासाठी लागणारी सिक्युरिटी (हमी) याबाबत सविस्तर विवेचन केले. योजनांमध्ये आवश्यकता नसते, तर काही योजना मर्यादित सिक्युरिटी घेतली जाते, माहिती त्यांनी दिली.


या सेमिनारला ओसवाल जैन संघचे सचिव ईश्वरलालजी साबद्रा,पारसनाथ देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष प्रकाश सैतवाल,व्यापारी एसोसिएशन व किराना अध्यक्ष ताराचंद झांवर, उपाध्यक्ष पुखराज डांगी, एमआयडीसी अध्यक्ष सुभाष बोहरा, अड़त अध्यक्ष प्रकाश कोठारी,कृषि अध्यक्ष प्रदीप लोढ़ा, डॉक्टर्स अध्यक्ष डॉ कांतिलाल ओस्तवाल,मेडिकल अध्यक्ष पंढरी पाटिल,कपड़े व्यापारी अध्यक्ष संजय चिंचकर,सीए उपाध्यक्ष अनिल मुनोत कार्यशाळेला उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज़िला उपाध्यक्ष विकास कोठारी, जामनेर शहर अध्यक्ष कुशल बोहरा, उपाध्यक्ष अभिनंदन जैन,सदस्य विकास ललवानी,मयूर पोरवाल,संजय ललवानी,कुणाल चंडालिया,महिला सदस्य मनीषा कोठारी,वंदना चोरड़िया , भाग्यश्री लुंकड आदि सदस्यंनी प्रयत्न केले.
कार्यशाळेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांना शासकीय योजनांविषयी स्पष्ट व उपयुक्त माहिती मिळाली असून,भविष्यात उद्योग वृद्धीसाठी या मार्गदर्शनाचा मोठा फायदा होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
सूत्र संचालन वंदना चोरड़िया आणि आभार प्रदर्शन डॉ कांतिलाल ओस्तवाल यानी केले.

error: Don't Try To Copy !!