जामनेर नगरपरिषद निवडणूक : प्रभाग 12-अ मधून अरविंद शांताराम तायडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जामनेर – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होताच प्रभाग क्रमांक 12-अ मध्ये राजकीय तापमान चढले आहे. अजित पवार गटाकडून अरविंद शांताराम तायडे यांनी आज दिमाखात आपला उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक लढविण्याची अधिकृत घोषणा केली. अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांची उपस्थिती, उत्साह आणि घोषणाबाजी यामुळे परिसरात निवडणुकीची रंगत चांगलीच वाढलेली दिसली. समाजसेवक, सक्रिय युवा नेता म्हणून प्रभागात ठसठशीत ओळख निर्माण केलेले अरविंद तायडे गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आहेत. नागरिकांशी थेट संवाद, सामाजिक कार्यात सहभाग आणि प्रभागातील मूलभूत सुविधांसाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांची जनसंपर्काची मजबूत पकड निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना तायडे म्हणाले, “पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता यांसह नागरिकांच्या दैनंदिन अडचणींना प्राधान्य देऊन काम करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. जनतेचा विश्वास जिंकून त्यांच्या अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.” तायडे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग 12-अ मध्ये चुरस अधिक तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. युवा मतदारांमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात असून, अंतिम टप्प्यात कोणाच्या बाजूने जनमत कलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read More

प्रभाग क्रमांक 12 मधून राजू चौधरी इच्छुक

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी सुपडू जाधवजामनेर शहरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असूनअनेक इच्छुक उमेदवार आपले उमेदवारी पक्षाकडून जाहीर व्हावे अशी मागणी करत आहेत. परंतु वाकी रोडवरील रहिवासी व राजू ऑटो गॅरेज चे संचालक राजू ईश्वरलाल चौधरी हे कोणत्याही पक्षाला उमेदवारी न मागता प्रभाग क्रमांक 12 मधून अपक्ष उमेदवार म्हणून लढणार आहेत.सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर म्हणून राहिलेले राजू ईश्वरलाल चौधरी हे नेहमी सामाजिक कार्यात व इतरांच्या सुखदुःखात सहभागी असतात सर्वांना परिचित असलेले राजू चौधरी हे एक व्यावसायिक असून त्यांचा चांगला जनसंपर्क आहे त्यामुळे त्यांनी कोणत्याही पक्षाकडे तिकीटाची सरळ मागणी न करता आपल्या परीने अपक्ष उमेदवार म्हणून आपण लढणार आहोत असे सांगितले. त्यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे प्रभागातील राजकिय समीकरण चांगलेच बदलू शकते राजू चौधरी यांच्या अपक्ष उमेदवारामुळे कोणाला फायदा व कोणाला तोटा होईल हे आता येणाऱ्या काळातच समजेल राजू चौधरी यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चा रंगू लागले आहे त्यामुळे समीकरणे हे निश्चित बदलणार आहेत.

Read More

जामनेर : सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवजामनेर शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले श्री. प्रदीप गायके, श्री. मनोज महाले, श्री. जीवन सपकाळ, प्रवीण गावंडे, यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.जामनेर निवास स्थानी महाराष्ट्राचे मंत्री श्री. गिरीशभाऊ महाजन यांनी नवागत कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत बाविस्कर, ज्येष्ठ नेते श्री. जे. के. चव्हाण, जामनेर शहर मंडल अध्यक्ष श्री. रविंद्र झाल्टे, जिल्हा सरचिटणीस श्री. आतिष झाल्टे, श्री. जितेंद्र पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाची जामनेर शहरातील संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

Read More

जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द परिसरात ढगफुटी:शेतकऱ्याचे अतोनात नुकसान-राष्टवादी कॉग्रेस नेत्यांची पाहणी, भरपाईसाठी शासनाला इशारा….

जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी-सुपडू जाधव आज बेटावद खुर्द परिसरात ढगफुटी झाल्यावर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे सर तालुका अध्यक्ष किशोर आप्पा पाटील बेटावद खुर्द परिसरात शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी केली शासनाने त्वरित पंचनामे करून योग्य भरपाई न दिल्यास लवकरच शेतकऱ्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चाचे आयोजन करू असा शब्द शेतकऱ्यांना दिला

Read More

जिल्हा परिषद प्रशाला अजिंठा येथे १९ वर्षांनंतर स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

दि.२७.१०.२५२००५-०६च्या बॅचच्या माजी शिक्षक – विद्यार्थ्यांची शाळेत गाठीभेट,आठवणींना उजाळाअजिंठा येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे तब्बल १९वर्षांनंतर २००५-०६ च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात पार पडला.दिनांक २६ ऑक्टोंबर रोजी आयोजित या सोहळ्यासाठी माजी विद्यार्थी सकाळी ९.०० वाजता आपल्या जुन्या शाळेत एकत्र जमले आणि शाळेच्या आठवणींनी सर्वांचे डोळे पाणावले,कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेत नियमित परिपाठ घेण्यात आला. त्यामध्ये प्रतिज्ञा, प्रार्थना, राष्ट्रगीत आणि सुविचार घेण्यात आले. यानंतर शिक्षकांनी सर्वांना संस्कारपूर्ण जीवनाचे मार्गदर्शन केले. “कुटुंबात कसे राहावे, सासू-सासरे व आई-वडिलांचा आदर करावा, मोबाईलचा वापर मर्यादित ठेवावा आणि एकमेकांना नेहमी मदत करून संपर्कात राहावे” असे मौल्यवान विचार शिक्षकांनी मांडले.कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणी, अनुभव आणि शिक्षणानंतरच्या प्रवासाबद्दल मनोगत व्यक्त केले. माझा हा बेंच… तू इथे बसायचास…अशा जुन्या आठवणींनी शाळेच्या वर्गखोल्यांत भावनिक वातावरण निर्माण झाले. एकमेकांच्या कुटुंबांविषयी, व्यवसायांविषयी माहिती देत सर्वांनी बालपणीच्या दिवसांना उजाळा दिला.या स्नेहमिलन सोहळ्यास अध्यक्षस्थानी कुलकर्णी सर होते. मार्गदर्शन निळकंठ लोसरवार सर, शंकर गाडेकर सर, राजेंद्र सरदार सर, अण्णा जगताप सर, बनकर मॅडम, श्रीरामवार मॅडम, बोरसे मॅडम, रवी गौंड सर, विजय कालभिले, पवार सर, सोनावणे सर, पाटील मॅडम, काळे मॅडम, शारदा मॅडम व सीमा मॅडम यांनी केले.कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन डॉ. शवर्षा देशमुख,संध्या झलवार यांनी केले.या सोहळ्यात अश्विनी खंडेलवाल, विद्या देशमुख, नलिनी जाधव, ज्योती तायडे, उज्वला लाड, वैशाली पोळ, सोनू राठोड, पूजा वैष्णव, माया नैनाव, दिपाली चव्हाण, सुषमा मानकर, अंकिता चोंडिये, आरती झलवार, अनिता गुप्ता, अनिता आगवाल, भारती झलवार, तसेच विष्णू मुके शास्त्री (पत्रकार), दिपक मुके, विनोद सोनावणे, राहुल सपकाळ, अंकुश लोखंडे, गोपाल पैठणकर, सागर ढाकरे, राजू कासुधने, इम्रान शेख, जफर, अभिषेक, चेतन कुमावत, रितेश माली, विशाल खंडेलवाल, निलेश पवार आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.शिक्षकांना कार्यक्रमाची आठवण म्हणून माजी विद्यार्थ्यांनी समूह छायाचित्र फ्रेम भेटवस्तू म्हणून दिली,कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी शाळेतील शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि पुढील काळात असे स्नेहमेलन आयोजित करण्याचा निर्धार केला,प्रत्येक मनुष्य आजीवन विद्यार्थीच असतो. शाळेतील सुवर्णक्षणांनी आज पुन्हा एकदा आम्हा सर्वांना बालपणात नेले,” असे उपस्थित विद्यार्थ्यांनी भावनिकपणे सांगितलेस्नेह मिलन एक ऊर्जा देणारा कार्यक्रम. माणूसपण जपणाऱ्या व संस्कार घडवणाऱ्या अशा प्रेरक व मार्गदर्शक कार्यक्रमांचे आयोजन प्रत्येक शाळेमधून व्हायला हवे.

Read More

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत गरुड विद्यालयाचे घवघवीत यश

धी शेंदुर्णी एज्युकेशन को-ऑप सोसायटीचेआ.ग.र गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथील विद्यार्थ्यांचे तायक्वांदो स्पर्धेत यश व विभागावर निवळ नुकत्याच जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेतील ज्या विद्यार्थ्यांची जिल्ह्यावर निवड झाली यापैकी 11 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून नुकताच जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेतून विजयी होत.सुवर्णपदक प्राप्त विजेते विद्यार्थी केवीन रवींद्र चौधरी, दक्ष लोखंडे,प्रद्युम्न जगताप,आर्यन वानखेडे,साहिल शेलार,चिन्मय सुर्वे, रागिणी पाटील,दृष्टी भारुडे,कामिनी नाथ,विनायक भोई,या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक मिळाले असून त्यांची विभागावर निवड झालेली आहे. तायक्वांदो स्पर्धेत 11 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक मिळाले 4 विद्यार्थ्यांना रौप्य पदक मिळालेले आहे . या 11 विद्यार्थ्यांची विभागावर निवड झालेली आहे.म्हणून या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजय रावजी गरुड व्हाईस चेअरमन आबासाहेब भीमराव शेळके,सचिव काकासोसागर मलजी जैन,सहसचिव दादासो यु यु पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसो दीपकजी गरुड,वस्तीगृह सचिव गो गो सूर्यवंशी,विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी, पर्यवेक्षक व्ही.एम शिरपुरे,पर्यवेक्षक विनोद पाटील या मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे देखील अभिनंदन केले.तसेच फिजिकल टीचर पी पी पाटील,अमोल पाटील,आर.एम.सपकाळे,पी एम पाटील,सचिन सुर्वे इत्यादी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Read More

वाकडी येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी-फत्तेपूर मंडळ कृषी अधिकारी श्री.एस.एस.लोहार

वाकडी.ता.जामनेर.दि.३०/०९/०२५ वाकडी येथे प्रामुख्याने भरपूर शेतकऱ्यांचे कपाशी पिकांचे नुकसान झाले ,अतिवृष्टी अकस्मात संकटामुळे शेतकरी हा हवालदिल झाला आहे,या आठवड्यातील अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे कपाशी, सोयाबीन,तूर,मका,केळी इतर कडधान्ये,या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, बराच ठिकाणी शेतजमीनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, यावेळी फत्तेपूर मंडळ कृषी अधिकारी श्री.एस.एस.लोहार, सहाय्यक कृषी अधिकारी श्री.राजेश नाईक, वाकडी पोलीस पाटील घनश्याम पाटील यांनी आज वाकडी येथील शेतकरी बाजीराव जोशी यांच्या शेतात जावून पिकांची पाहणी तसेच वाकडी परिसरात प्रत्यक्ष शेतात जावून सर्व भागाची पाहणी केली,वाकडी येथील तलाठी परशुराम पवार, कोतवाल वैभव न्हावी यांनी शेतात जावून पिकांची पाहणी करून पंचनामे केली आहे,कुठला नुकसान ग्रस्त शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, वाकडी येथील शेतकऱ्यांच्या लवकर अहवाल तयार करावा अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहेत.

Read More

शहापूर धरणाजवळ भीषण अपघात बसच्या धडकेत एस.टी. कंडक्टर ईश्वर कंडागळे यांचा मृत्यू – गावात शोककळा

जामनेर (२५ ऑगस्ट):जे रोज प्रवाशांच्या जीवाची काळजी घेत बसने सुरक्षित घरी पोहोचवत होते… त्यांचेच जीवन बसच्या चाकाखाली संपले अशा शब्दांत आज गावकऱ्यांनी ईश्वर अरुण कंडागळे यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली. जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा येथील ईश्वर कंडागळे (वय 33) हे एस.टी. महामंडळात कंडक्टर म्हणून कार्यरत होते. आज सायंकाळी शहापूर धरणाजवळ झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वर कंडागळे हे स्वतःच्या दुचाकीवरून जात असताना एस.टी. बस (क्र. MH 20 BL 3360) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर एवढा भीषण होता की ते जागीच कोसळले आणि मृत्यूने त्यांना कवटाळले.विडंबना म्हणजे ज्यांनी आयुष्यभर प्रवाशांची सेवा केली, त्यांचाच जीव अखेर एस.टी. बसच्या धडकेत गेला. या घटनेने सहकारी व ग्रामस्थ स्तब्ध झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.अपघातानंतर नागरिकांनी धाव घेत तात्काळ मदत केली. ईश्वर कंडागळे यांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण चिंचखेडा गाव शोकसागरात बुडाले आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे अशी माहिती मिळाली

Read More

अंशतः अनुदानित शिक्षकांना मोठा दिलासा! मुख्यमंत्री फडणवीस यांचा शब्द – ‘शिक्षकांना न्याय मिळणार’आ. किशोर दराडे सत्यजित तांबे यांच्या पुढाकाराने शिक्षक आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक; अधिवेशनात तोडग्याची हमी

नाशिक (प्रतिनिधी) – राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांच्या लढ्याला मोठे यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक विभागाचे शिक्षक आमदार आ. किशोर दराडे सत्यजित तांबे यांच्या आग्रही पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिक्षक आमदारांची निर्णायक बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ठाम शब्द देत, “शिक्षकांवर अन्याय होणार नाही. शासनाकडून विलंब झाला असला, तरी यंदाच्या अधिवेशनात शिक्षकांना निश्चित दिलासा मिळेल,” अशी ग्वाही दिली.आ. किशोर दराडे यांचा आक्रमक पाठपुरावाशिक्षकांच्या मागण्यांसाठी आ. किशोर दराडे यांनी नाशिकमध्ये शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी थेट राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला. आ. सत्यजित तांबे, विक्रम काळे आ. किरण सरनाईक आणि आ. जयंत तासगावकर यांच्यासह त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आणि शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना गती देण्याची मागणी केली.मुख्यमंत्र्यांचे आश्वासनमुख्यमंत्र्यांनी 14 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर झालेल्या 20% वाढीव वेतन अनुदानाच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी रखडल्याची बाब मान्य केली. “लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल,” असे सांगत त्यांनी शिक्षकांना दिलासा दिला. आगामी अधिवेशनात आर्थिक आणि प्रशासकीय अडथळे दूर करून शिक्षकांच्या मागण्यांवर ठोस तोडगा काढण्याचे प्राधान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.शिक्षकांमध्ये नव्या आशेचा संचारमुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे आंदोलनात सहभागी शिक्षकांमध्ये उत्साह आणि नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे. नाशिकसह राज्यभरातील शिक्षक संघटना एकजुटीने लढत असून, आ. किशोर दराडे यांच्या राजकीय पाठबळामुळे आंदोलनाला बळ मिळाले आहे. अधिवेशनात शिक्षकांना न्याय मिळण्याची अपेक्षा आता वाढली आहे.‘शिक्षकांचा लढा यशस्वी होणार!’या सकारात्मक घडामोडींमुळे शिक्षकांचा आवाज आता शासनापर्यंत पोहोचला असून, अधिवेशनातील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.यासाठी महासंघाचे अध्यक्ष डॉ संजय शिंदे , ‘शिक्षक सेना प्रा. संजय चव्हाण ,शिक्षक समन्वय संघाच्या वतीने अनिल परदेशी, सुभाष पवार, कर्तरसिंग ठाकूर, रवी पवार ,प्रकाश तायडे, तसेच जुक्टो संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील गरुड ,शैलेश राणे ,नंदन वळींकार, सुनील सोनार यासह मोहन चकोर आधी पदाधिकारी यांनी आमदार किशोर दराडे, सत्यजित तांबे, विक्रम काळे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

Read More

लुबाडलेले 1600 रुपये काही मिनिटांतच सैनिकाच्या खात्यात परत

पाचोरा – निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारिता हे लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून ओळखले जाते, याचे जिवंत उदाहरण नुकतेच पाचोरा येथे पाहायला मिळाले पत्रकार संदीप महाजन यांनी अनधिकृत रेल्वे तिकीट एजंटकडून भारतीय सैनिकाची करण्यात आलेली आर्थिक लुबाडणूक उघडकीस आणताच संबंधित भामट्याने युद्धजन्य परिस्थिती काळात अफरातफरीत केलेली फसवणूक लपवण्यासाठी केवळ काही मिनिटांतच सैनिकाच्या खात्यात 1600 रुपये परत वर्ग केले.ही घटना आहे पिंपरी सार्वे येथील रहिवासी आणि सध्या CISF मध्ये कार्यरत असलेल्या जवान प्रदीप बाविस्कर यांच्या बाबतीत. देशात युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळे जवानांना तातडीने त्यांच्या सेवास्थळी परत हजर राहण्याचे आदेश मिळाले होते. या घाईत त्यांनी रेल्वे तिकीट काढण्यासाठी पाचोरा येथील तिकीट एजंटची मदत घेतली. मात्र त्या एजंटने एका सामान्य तिकिटासाठी वाजवी रक्कमेपेक्षा तब्बल 1600 रुपये जास्त रक्कम आकारून लुबाडणूक केली.या प्रकाराची माहिती पत्रकार संदीप महाजन यांना मिळताच त्यांनी या विषयावर सखोल चौकशी केली आणि समाजमाध्यमांद्वारे, तसेच ‘ध्येय न्यूज’च्या माध्यमातून ही धक्कादायक बातमी सर्वांसमोर आणली. पत्रकारितेतील जबाबदारी आणि लोकहितासाठी त्यांनी दाखवलेली तत्परता पाहून ही बातमी काही वेळातच व्हायरल झाली. बातमीचा समाजावर, प्रशासनावर आणि संबंधित एजंटवर इतका परिणाम झाला की, संबंधित एजंटने काही मिनिटांत जवानाच्या खात्यावर 1600 रुपयांची रक्कम परत पाठवली.ही घटना ही केवळ पत्रकाराच्या सचोटीची विजयगाथा नाही, तर हे एक जिवंत उदाहरण आहे की सत्याचे धारदार लेखणीसमोर अन्याय करणाऱ्यांची लाचारी उघड होते. पत्रकार महाजन यांनी या प्रकरणात कोणत्याही आमिषाला बळी न पडता, केवळ सैनिकाचा हक्क परत मिळावा या हेतूने ही बातमी उघडकीस आणली.या प्रकरणानंतर शहरातील जनमानसात पत्रकार महाजन यांच्या कार्याची भरभरून स्तुती होत असून अनेकांनी सोशल मीडियावर “हीच खरी पत्रकारिता” असे म्हटले आहे. शिवाय, यामुळे भविष्यात या आणि अशाप्रकारे लूट करणाऱ्या अनधिकृत रेल्वे एजंटांचा धसका बसेल व सामान्य नागरिकांची लुबाडणूक टळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.प्रशासनाने सुद्धा या भामट्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. पत्रकारिता म्हणजे केवळ माहिती पोहोचवणे नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्याचे हत्यार आहे, याचे हे अत्यंत प्रभावी उदाहरण आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!