दि.२७.१०.२५
२००५-०६च्या बॅचच्या माजी शिक्षक – विद्यार्थ्यांची शाळेत गाठीभेट,आठवणींना उजाळा
अजिंठा येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे तब्बल १९वर्षांनंतर २००५-०६ च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात पार पडला.दिनांक २६ ऑक्टोंबर रोजी आयोजित या सोहळ्यासाठी माजी विद्यार्थी सकाळी ९.०० वाजता आपल्या जुन्या शाळेत एकत्र जमले आणि शाळेच्या आठवणींनी सर्वांचे डोळे पाणावले,
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेत नियमित परिपाठ घेण्यात आला. त्यामध्ये प्रतिज्ञा, प्रार्थना, राष्ट्रगीत आणि सुविचार घेण्यात आले. यानंतर शिक्षकांनी सर्वांना संस्कारपूर्ण जीवनाचे मार्गदर्शन केले. “कुटुंबात कसे राहावे, सासू-सासरे व आई-वडिलांचा आदर करावा, मोबाईलचा वापर मर्यादित ठेवावा आणि एकमेकांना नेहमी मदत करून संपर्कात राहावे” असे मौल्यवान विचार शिक्षकांनी मांडले.
कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणी, अनुभव आणि
शिक्षणानंतरच्या प्रवासाबद्दल मनोगत व्यक्त केले. माझा हा बेंच… तू इथे बसायचास…अशा जुन्या आठवणींनी शाळेच्या वर्गखोल्यांत भावनिक वातावरण निर्माण झाले. एकमेकांच्या कुटुंबांविषयी, व्यवसायांविषयी माहिती देत सर्वांनी बालपणीच्या दिवसांना उजाळा दिला.
या स्नेहमिलन सोहळ्यास अध्यक्षस्थानी कुलकर्णी सर होते. मार्गदर्शन निळकंठ लोसरवार सर, शंकर गाडेकर सर, राजेंद्र सरदार सर, अण्णा जगताप सर, बनकर मॅडम, श्रीरामवार मॅडम, बोरसे मॅडम, रवी गौंड सर, विजय कालभिले, पवार सर, सोनावणे सर, पाटील मॅडम, काळे मॅडम, शारदा मॅडम व सीमा मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन डॉ. शवर्षा देशमुख,संध्या झलवार यांनी केले.
या सोहळ्यात अश्विनी खंडेलवाल, विद्या देशमुख, नलिनी जाधव, ज्योती तायडे, उज्वला लाड,
वैशाली पोळ, सोनू राठोड, पूजा वैष्णव, माया नैनाव, दिपाली चव्हाण, सुषमा मानकर, अंकिता चोंडिये, आरती झलवार, अनिता गुप्ता, अनिता आगवाल, भारती झलवार, तसेच विष्णू मुके शास्त्री (पत्रकार), दिपक मुके, विनोद सोनावणे, राहुल सपकाळ, अंकुश लोखंडे, गोपाल पैठणकर, सागर ढाकरे, राजू कासुधने, इम्रान शेख, जफर, अभिषेक, चेतन कुमावत, रितेश माली, विशाल खंडेलवाल, निलेश पवार आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
शिक्षकांना कार्यक्रमाची आठवण म्हणून माजी विद्यार्थ्यांनी समूह छायाचित्र फ्रेम भेटवस्तू म्हणून दिली,
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी शाळेतील शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि पुढील काळात असे स्नेहमेलन आयोजित करण्याचा निर्धार केला,
प्रत्येक मनुष्य आजीवन विद्यार्थीच असतो. शाळेतील सुवर्णक्षणांनी आज पुन्हा एकदा आम्हा सर्वांना बालपणात नेले,” असे उपस्थित विद्यार्थ्यांनी भावनिकपणे सांगितले
स्नेह मिलन एक ऊर्जा देणारा कार्यक्रम. माणूसपण जपणाऱ्या व संस्कार घडवणाऱ्या अशा प्रेरक व मार्गदर्शक कार्यक्रमांचे आयोजन प्रत्येक शाळेमधून व्हायला हवे.
