जामठी येथील महाजन विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा – “आठवणींचा सोहळा २०२५” उत्साहात संपन्न..

जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेर
प्रतिनिधी-सुपडू जाधव
जामठी, दि. २५ ऑक्टोबर (वार्ताहर)
श्रीमती चि. स. महाजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामठी येथे “माजी विद्यार्थी मेळावा – आठवणींचा सोहळा २०२५” हा सोहळा अत्यंत उत्साहवर्धक आणि भावनिक वातावरणात माजी विद्यार्थ्यांच्या स्वखर्चातून मोठ्या आनंदात पार पडला. या उपक्रमाने सन २०१० बॅचमधील माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शालेय जीवनातील सुवर्ण

क्षणांची अनुभूती दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. कैलास सत्रे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव श्री. भगवान महाजन, संचालक श्री. बी. इ. भुसारी, श्री. बी. सी. शेळके,श्री एम.ए.सत्रे तसेच मुख्याध्यापक श्री. पी. पी. पवार उपस्थित होते.
कार्यक्रमास निवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांपैकी श्री. के. आर. पाटील, श्री. के. एस. बारी, श्री. एस. आर. तायडे, श्री. एस. टी. कोळी, श्री. एस. डी. महाजन, श्री. बी. डी. दांडगे, श्री. पी. डी. पाटील, श्री. पी. एस. सरोदे,श्री. जी.बी. गावंडे,श्रीमती पी. एस. पाटील, श्री. एस. एस. पाटील, श्री. जी. एस. पाटील, श्री. एन. पी. चौधरी, श्री. व्ही. आर. चौधरी,श्री.ए.आर.जंगले,श्री.एस.व्ही.पंडीत,श्री.के.बी.महाजन,श्री.अमित परखड,

\

श्री.डि.यु.राठोड, श्री.सुधाकर गाढे, श्री. बावस्कर, श्री. गोरे श्री.चांगदेव सपकाळ तसेच शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सुत्रसंचालन कोमल शर्मा व रोहन लोखंडे यांनी प्रभावीपणे केले.
माजी विद्यार्थ्यांकडून विद्यालय परिसरात विविध फळझाडांची रोपं लावण्यात आली. तसेच २०१० च्या माजी विद्यार्थी संघातर्फे शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांना विशेष मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय यावेळी करून दिला.
कार्यक्रमात श्री. के. आर. पाटील व श्री. एस. आर. तायडे यांनी आपली मनोगते व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा दिला. श्री. के. एस. बारी यांनी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव एक सुंदर कविता सादर करून सर्वांना भावविभोर केले आणि मनोगत व्यक्त केले. तसेच श्रीमती पी. एस. पाटील मॅडम यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला.
माजी विद्यार्थ्यांनी स्वखर्चाने शाळेला ज्ञानदिप व मोठा फोकस लाईट यावेळी सप्रेम भेट दिला.

मनोगतात श्री. रोहन लोखंडे यांनी १५ वर्षांनी संस्थेचा झालेला आमूलाग्र कायापालट, शिक्षकांच्या गोड आठवणी आणि शाळेबद्दलचे आत्मीय संबंध यांचा भावपूर्ण उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, “शाळा ही फक्त शिक्षणाची जागा नसून आयुष्याच्या पाया रचणारे मंदिर आहे. आज पुन्हा त्या आठवणींमध्ये रमण्याचा योग आला, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”

अध्यक्षीय भाषणात श्री. कैलास सत्रे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, संस्कार व सामाजिक जबाबदारी यांवर सखोल प्रकाश टाकला. त्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. रोहन लोखंडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
या मेळाव्यामुळे विद्यालयाचा परिसर पुन्हा एकदा आनंद, आठवणी आणि भावनांनी ओथंबून गेला.

error: Don't Try To Copy !!