भगवान सेना तर्फे डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी
जामनेर (प्रतिनिधी)
जामनेर तालुक्यातील भगवान सेना तर्फे डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात भगवान सेना प्रतिनिधींनी यांनी जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन सादर केले.
या वेळी भगवान सेना जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, तालुकाध्यक्ष गजानन वासुदेव घ्यार, ज्येष्ठ समाजसेवक वसंत व्यवहारे, दत्तात्रेय नामदेव पाटील, प्रदीप तुकाराम पाटील, अतुल सुभाष पढार व शहराध्यक्ष जितेंद्र श्रीराम काळे उपस्थित होते.
भगवान सेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेऊन संबंधितांना शिक्षा होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. या निवेदनावर शासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
