जामनेर नगरपरिषद निवडणूक 2025

जामनेर तालुका (प्रतिनिधी)
जामनेर नगरपरिषद निवडणुकीत गुरुवार, दि. 13 नोव्हेंबर 2025 रोजी सर्वांचे लक्ष वेधून घेत वार्ड क्रमांक 1 (अनुसूचित जाती प्रवर्ग) मधून भारतीय जनता पार्टीतर्फे पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला. डॉ. योगेश रामचंद्र इंगळे यांनी भाजपाच्या अधिकृत उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज सादर करून निवडणूक रिंगणात दमदार प्रवेश केला.

अर्ज दाखल करताना इंगळे परिवारासह डॉ. संदीप सरताळे दादा, डॉ. पवन पाटील दादा, हिरामण तायडे, जीवन सावळे सर, तसेच शास्त्रीनगरातील मोठ्या संख्येने उपस्थित सहकाऱ्यांनी उत्साहाने शक्तीप्रदर्शन केले.
यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले असून वार्ड क्रमांक 1 मध्ये भाजपाकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

डॉ. योगेश इंगळे यांच्या अर्ज दाखल प्रक्रियेमुळे जामनेर नगरपरिषद निवडणुकीत नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात झाल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.

error: Don't Try To Copy !!