नेरी दिगर (ता. जामनेर) | दिनांक ०४ जून २०२५ रोजी महसूल मंडळ नेरी अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर ग्रामपंचायत नेरी दिगर येथील महादेव मंदिर सभामंडपात मोठ्या उत्साहात व व्यापक जनसहभागातून संपन्न झाले. या शिबिरात विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जळगाव जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल, उपविभागीय अधिकारी श्री विनय गोसावी यांच्यासह

सर्व विभागांचे तालुका प्रमुख उपस्थित होते.
शिबिराची सुरुवात उपविभागीय अधिकारी श्री विनय गोसावी यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी शिबिराच्या उद्दिष्टांबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी नागरिकांसमोर
आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “राजस्व समाधान शिबिरे ही सेवा पुरवठ्यापेक्षा अधिक असून, शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा सशक्त करण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे.”

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी अशा शिबिरांच्या फलश्रुतीवर भर देत सांगितले की, “ग्रामस्तरावर अशा उपक्रमांमुळे योजनांची अंमलबजावणी कृतीशीलपणे होते व लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचते.”
शिबिरातील विभागनिहाय लाभ:
- संजय गांधी निराधार योजना – 230 लाभार्थी
- कृषी विभाग सेवा – 70 लाभार्थी
- PM किसान सन्मान योजना – 18 लाभार्थी
- कृषी यांत्रिकीकरण (ट्रॅक्टर अनुदान) – 2
- ठिबक सिंचन योजना – 2
- शिधापत्रिका वाटप – 82
- प्राथमिक आरोग्य तपासणी (PHC) – 410 नागरिक
- माझी कन्या भाग्यश्री योजना – 1 लाभार्थी
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना – 1 लाभार्थी
- लेक लाडकी योजना – 29 लाभार्थी
- सेतू केंद्राद्वारे प्रमाणपत्र वाटप
- उत्पन्न प्रमाणपत्र – 30
- जात प्रमाणपत्र – 48
- वय, अधिवास व रहिवास – 38
- मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड वाटप – 9 लाभार्थी
- गर्भवती महिलांना बेबी केअर किट वाटप – 2 लाभार्थी

ठळक उपक्रम:
- हिंदू समाज स्मशानभूमीसाठी 30 आर शासकीय जागेचे वाटप (गट क्र. 293 व 315, नेरी दिगर)
- एकूण लाभार्थी संख्याः ९७७
कार्यक्रमाची सांगता तहसीलदार श्री नानासाहेब आगळे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. त्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व विभागप्रमुख, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे आभार मानले.