Jbn न्यूज जामनेर प्रतिनिधी
दिनांक 5/09 20025
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा गावामध्ये मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद-उन-नबीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. सकाळी मुस्लिम बांधवांनी मशिदींमध्ये एकत्र जमून नमाज अदा केली. त्यानंतर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनकार्याची आठवण करून देण्यात आली.
तसेच गावातून शोभायात्रा काढण्यात आली. या जुलूसामध्ये मुलांनी धार्मिक झेंडे, फलक घेऊन सहभाग घेतला. ठिकठिकाणी गावात नागरिकांनी गुलाबपुष्प वर्षाव करून एकमेकांना पेढे वाटप करून जुलूसाचे स्वागत केले.
शांती, बंधुभाव आणि ऐक्याचा संदेश देत हा उत्सव पार पडला.
आणि संकाळी धार्मिक व्याख्याने, कव्वाली तसेच मिलाद शरीफचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमानंतर मुस्लिम बांधवांनी व नागरिकांनी एकत्र येऊन शिरखुर्मा गोड जेवण व विविध पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेतला.
या संपूर्ण उत्सवामध्ये ज्येष्ठ नागरिक शब्बीर सेट सरपंच आरिफ लोकमान शिवाप्पा चोपडे,ईश्वर कोळपे, मोहम्मद तालीम मोहम्मद अफसर मोहम्मद अस्लम आसिफ शेख रियाज शेख सामाजिक कार्यकर्ते जीवन कोलते, गणेश खैरे पोलीस पाटील विलास कुल्ली रोशन मोहम्मद गफार तडवी कदिर तडवी अशपाक मोहम्मद दिलीप देशमुख सुनील चोरमाले पत्रकार बंधू व सर्व गावातील नागरिक यांनी कार्यक्रमात आनंद व्यक्त केला
तसेच कुणाला गालबोट लागणार नाही याची खबरदारी घेत पोलीस कर्मचारी जमादार मिरखा तडवी शिवदास गोपाळ व त्यांचे सवंगडी होमगार्ड यांनी चोक बंदोबस्त दिला होता